
The Rajiyas cast a shadow of crisis over Mumbai!
Sakal
नेमकी तीथ सांगावयाची तर विश्वावसु संवत्सरातील १९४७ वे शक चालू असताना, एका आश्विनातली ती सकाळ होती. (तिथी गुलदस्त्यात!) दिवाळीचे दिवस होते. रात्रीही दिवाळीच्याच होत्या, हे उघडच आहे. पण त्रयोदशीच्या मुहूर्तावर राजियांनी अचानक सर्व शिलेदारांस बलाऊ धाडिले, आणि ‘काळ मोठा कठीण आला आहे’ ऐसा इशारा दिला. शिलेदारांस नवल वाटले नाही, कारण गेली अनेक वर्षे काळ कठीणच होता. यापुढेही राहील. त्यात काय येवढे?