
हौस ऑफ बांबू
नअस्कार! कवी, संगीतकार, हार्मोनियमवादक, मैफलकार, मित्र, दिग्दर्शक, निर्माता अशा अनेक भूमिका समर्थपणे वठवणारे पुण्यातील लोकल संजय लीला भन्साळी ऊर्फ सूरमित्र डॉ. सलील कुलकर्णी यांच्या एका कवितेमुळे मी इतकी हादरुन गेल्ये आहे की, तीन दिवस सोशल मीडियावर जाऊन काही रिळे आणि पोष्टी बघण्याचा धीरच होत नाही. काही दिवसांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास डोक्यावर पांघरुण घेऊन सोशल मीडियावरच्या रिळा बघत बसल्ये होते. तेवढ्यात सूरमित्र सलीलची एक कविता दृष्टीला पडली. प्रथमदर्शनी विश्वास बसेना.