
ढिंग टांग
आम्ही आधीपासूनच उच्चरवात ओर्डत होतो की ‘इव्हीएम नावाचे ते भिक्कारडे डबडे दूर समुद्रात फेकून द्या. धड ना चपटे, धड ना पोकळ अशा या डबड्यात तुळशीचे रोपटेदेखील लावता येणार नाही. असले डबडे काय कामाचे? इव्हीएम या शब्दाचा नुसता उच्चार जरी केला, तरी आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. इव्हीएम या एकेक अक्षराने सुरु होणाऱ्या प्रत्येकी तीन शिव्या आमच्या जिभेवर येतात. ते टिनपाट डबडे दृष्टीस पडले तरी आम्ही खवळतो.