
हौस ऑफ बांबू
नअस्कार! मला कोथरुडची विद्या सिन्हा असं लोक चिडवतात. पण मी लक्ष देत नाही. काही वर्षांपूर्वी स्वरुप संपतही म्हणत होते. बोलणाराची तोंडं तरी किती (आणि कशी) बंद करणार? गेल्या सोमवारी मात्र मला राहावलं नाही. दोन्ही खांद्यावर पदर घेऊन लांब केसात टप्पोरं फूल माळून एक सुंदर युवती तुम्हाला एसेम जोशी सभागृहाकडे जाताना दिसली का? मीच ती!!