प्रसिद्धीलोलुप ट्रम्पशाही

प्रसिद्धीलोलुप ट्रम्पशाही

अमेरिकेतील अध्यक्षांच्या निवडणुकीचा राजकीय संदेश कोण जिंकले हा मुळीच नाही. डोनाल्ड ट्रम्प जिंकतात की नाही यावरही हे अवलंबून नाही. अमेरिकेच्या राजकीय भवितव्यासह जगभरातील लोकशाही राष्ट्रांवर विशेषतः भारतावर काय परिणाम होईल यादृष्टीने विचार करताना ट्रम्प यांना लोकप्रिय मतांपैकी ४८ टक्के मिळाली हे ध्यानात ठेवावे लागेल. हे कसे शक्य झाले? यावरून सुरू झालेले प्रश्नसत्र एवढ्यावर थांबत नाही. या निवडणुकीत जवळपास सात कोटी अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांना मत दिले. ज्याने जगभरात अमेरिकेचे स्थान कमकुवत केले आणि एकधृवीय जगात जागतिक महासत्तेचे स्थान चीनला जवळपास भेट केले अशा माणसाला एवढी मते मिळाली कशी? गेल्या चार वर्षांपासून सर्व राजकीय पंडित आणि राजकीय भाष्यकारांनी बायडेन हे अध्यक्षीय निवडणुकीत डोळे झाकून विजयी होतील, असे भाकीत केले होते. 

यातील कुणालाही ट्रम्प हे निवडणुकीची शर्यत प्रतिस्पर्ध्यांसाठी एवढी कठीण करतील याची कुणी कल्पना केली होती का ? कोरोना संकटाच्या काळात त्यांच्या हाकेवर फ्लोरिडा आणि नॉर्थ कॅरोलिना या राज्यांतील मतदार त्यांना भरभरून प्रतिसाद देतील. पेनसिल्व्हानिया, विस्कॉन्सिन, मिशिगन आणि नेवाडा या राज्यांत अटीतटीचा सामना होईल याचा कुणाला अंदाज बांधता आला नाही. हे सारे वेडसर ठरवण्यात आलेल्या ट्रम्प यांनी घडवून आणले. जगावर कोरोनाचे संकट आले नसते, ज्याची हाताळणी ट्रम्प यांनी अतिशय वाईट पद्धतीने केली, तर ट्रम्प यांचा मोठा विजय झाला नसता काय? टेक्सासमधील ‘हाऊडी मोदी‘ कार्यक्रमात ट्रम्प यांच्या हातात हात घालून मोदी यांनी जी फेरी मारली तेव्हा मोदी आणि त्यांच्या समर्थकांना निवडणुकीत ट्रम्प यांची जादू चालण्याचीच अपेक्षा होती. तेव्हा वुहानमध्ये एक विषाणू आपले काम करतोय हे कुणाच्या गावीही नव्हते. 

निव्वळ आकडेवारीचा आधार घेतला तर ट्रम्प यांचा अमेरिका महामारीच्या वाईट हाताळणीत विजेता ठरल्याचे दिसून येते. आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक सुविधांसाठी आघाडीवर असलेल्या देशात त्यांनी कोरोना संकटाला कस्पटासमान वागणूक दिली. कोणताही शास्त्रीय आधार नसताना कोरोनावरील इलाज म्हणून काही औषधे पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवली. या साऱ्या कोलाहलात कोरोनाने त्यांनाही गाठले. या काळातील त्यांच्या कामगिरीचे गचाळ या एकाच शब्दात वर्णन करता येईल. असे असतानाही शहरांमागून शहरे आणि गावांमागून गावे, जेथे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला अशा भागात ट्रम्प यांनी मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक मते खेचली. आपल्याला आवडो अथवा न आवडो लोकशाहीत हा प्रकार आता चांगलाच रुजू लागला आहे. यामुळेच हा या निवडणुकीचा महत्त्वाचा संदेश असल्याचे मानले जाते. दुर्जनांच्या नेत्याकडे कौशल्य असेल आणि बहुसंख्याकांच्या असुरक्षिततेला हवा देण्याची त्याच्याकडे हातोटी असेल तर असा नेता आपला जनाधार वाढवू शकतो, हे यानिमित्ताने दिसून आले. भारतातही हिंदी भाषिक राज्ये तसेच पश्चिमेतील गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये अल्पसंख्याकांबद्दलदी घृणा हा बहुसंख्याकांचा जनाधार वाढविणारा मुद्दा ठरतोय.

ट्रम्प यांनी मोदींप्रमाणे उजव्यांच्या पक्षाचा ताबा घेत या पक्षाची विचारधारा नव्याने लिहून काढली. ट्रम्प यांनी कामगारांपुढे रागारागात केलेले भाषण आठवा. त्यातील सर्व मुद्दे मोदी यांनी मागील सहा वर्षांत राबविलेल्या धोरणाशी साधर्म्य दाखवतात. ही धोरणे गरिबांची बाजू घेणारी आणि त्यांची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने झाल्याचे सांगण्यात येऊन श्रीमंतांवरील कराचा बोजा वाढवला जातो. ट्रम्प यांनीही रिपब्लिकन पक्षाचे बखोटे धरून त्याची सर्व ध्येयधोरणे मोडीत काढली. अर्थव्यवस्थेने गटांगळ्या खाणे सुरू केल्यामुळे जागे झालेल्या मोदी यांनी आपली वाट आताशा थोडी बदलणे सुरू केले आहे. भाजप हा खुला व्यापार, खासगीकरण, कमी कर, संपत्ती जमा करणाऱ्यांच्या बाजूचा पक्ष असल्याचे समज होता. हे सारे विचार आता शीतगृहात ठेवण्यात आले आहेत. अत्यंत चुकीच्या पद्धतीने देशाचा कारभार चालवून तसेच पक्षाच्या ध्येयधोरणांना तिलांजली देऊनही ट्रम्प यांनी जवळपास निम्म्या नागरिकांना मत देण्यास भाग पाडले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सीएनएनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक अँडरसन कुपर यांनी ट्रम्प यांना समुद्रकिनाऱ्यावर उलट्या पडलेल्या लठ्ठ कासवाची उपमा दिली. ट्रम्प यांचे समर्थक याकडे कसे बघतात ? अभिजनांबाबत ट्रम्प नेहमीच सत्य बोलतात, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. भारतात इंग्रजी बोलणारा वर्ग मोदी यांना ‘स्ट्रेग्थ''या शब्दाचा योग्य उच्चार करता येत नाही म्हणून हसत असतात. यामुळे सांस्कृतिक ओळख आणि अभिजनांबद्दल घृणा यावर आधारित असलेला त्यांचा जनाधार अधिक बळकट होत जातो. ट्रम्प यांची तर अशाप्रकारे अक्षरशः लाखो वेळा जाहीर खिल्ली उडवण्यात आली आहे. आता तुम्हाला अर्ध्या अमेरिकेने त्यांना मत का दिले याचे उत्तर सापडेल.

ट्रम्प यांचा प्रभाव ओळखता आला नाही
अमेरिकेत ट्रम्पशाही या नव्या विचारधारेचा उदय झाला. आत्तापर्यंतचे वागणे बघता त्यांचा पराभव झाला तरीही ते पूर्वसुरींप्रमाणे सहजासहजी पदावरून पायउतार होणार नाहीत. कारण ते परंपरा धुडकावून लावणारे आहेत. तुम्हाला त्यांच्या वारशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमधील अत्यंत हुशार माणसे आणि प्रसारमाध्यमांना ट्रम्प यांचा प्रभाव जोखता आला नाही. जसा भारतात मोदींचा प्रभाव भल्याभल्यांना कोड्यात पाडणारा आहे. लोकांना खूष ठेवणे हा सतत जिंकण्याचा मार्ग आहे या सिद्धांताचा आपल्या विश्लेषणावर अजूनही पगडा आहे. पण बिल क्लिंटन यांनी, ‘मूर्खांनो, याचा अर्थव्यवस्थेची संबंध आहे’ असे सांगितले नव्हते काय? तसे असेल तर अर्थव्यवस्था डुचमळत असताना मोदी यांना २०१९ मध्ये आधीच्या तुलनेत अधिक जनाधार कसा मिळाला? आणि कोरोना रुग्णसंख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर गेलेल्या अमेरिकेत ट्रम्प यांना एवढी मते कशी मिळाली?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रम्प यांचा प्रभाव ओळखता आला नाही
अमेरिकेत ट्रम्पशाही या नव्या विचारधारेचा उदय झाला. आत्तापर्यंतचे वागणे बघता त्यांचा पराभव झाला तरीही ते पूर्वसुरींप्रमाणे सहजासहजी पदावरून पायउतार होणार नाहीत. कारण ते परंपरा धुडकावून लावणारे आहेत. तुम्हाला त्यांच्या वारशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमधील अत्यंत हुशार माणसे आणि प्रसारमाध्यमांना ट्रम्प यांचा प्रभाव जोखता आला नाही. जसा भारतात मोदींचा प्रभाव भल्याभल्यांना कोड्यात पाडणारा आहे. लोकांना खूष ठेवणे हा सतत जिंकण्याचा मार्ग आहे या सिद्धांताचा आपल्या विश्लेषणावर अजूनही पगडा आहे. पण बिल क्लिंटन यांनी, ‘मूर्खांनो, याचा अर्थव्यवस्थेची संबंध आहे’ असे सांगितले नव्हते काय? तसे असेल तर अर्थव्यवस्था डुचमळत असताना मोदी यांना २०१९ मध्ये आधीच्या तुलनेत अधिक जनाधार कसा मिळाला? आणि कोरोना रुग्णसंख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर गेलेल्या अमेरिकेत ट्रम्प यांना एवढी मते कशी मिळाली?

(अनुवाद : किशोर जामकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com