आयुष्य आनंदमय, आरोग्यमय व्हावे यासाठी सद्गुरूंचा आशीर्वाद कसा उपयोगी पडेल, यादृष्टीने उपासना करण्याचा दत्तजयंतीचा दिवस.
श्री सद्गुरू दत्तात्रेय, अनसूया-अत्रिनंदन हे सर्व मानवजातीला कलियुगात तारणारे असे एकमेव सद्गुरू. श्रीदत्तमहाराज हे गुरूंचे गुरू. गुरू, सद्गुरु, परात्पर गुरू, आदिगुरू या साखळीतील आदिगुरु आहेत श्रीदत्त भगवान. ज्ञानदानाची परंपरा ज्या सद्गुरूंनी आपल्या सर्व अंशात्मक गुरूंमार्फत चालविली ते हे श्री सद्गुरू दत्तात्रेय. श्रीदत्तात्रेयांच्या ध्यानाचा एक श्र्लोक सर्वांचा परिचित आहे तो असा,