

Social Media Reality
Sakal
गौरी मांजरेकर
आजच्या डिजिटल युगात समाजमाध्यमे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. मित्र-मैत्रीणींशी संवाद साधणे, माहिती मिळविणे आणि मनोरंजन करणे यासाठी लोक समाजमाध्यमांवर आपल्या जगण्यातील अधिकांश वेळ घालवितात. मात्र, समाजमाध्यमांच्या अतिरेकामुळे नात्यांमध्ये गैरसमज, अविश्वास, आणि मानसिक तणाव निर्माण होऊन घटस्फोटांच्या वाढत्या प्रकरणांमुळे ही एक सामाजिक समस्या म्हणून उदयास आली आहे.