World News Day : कोरोनाने वाढविले बातमीचे महत्त्व

World News Day  : कोरोनाने वाढविले बातमीचे महत्त्व

काल-परवापर्यंत बातमीवर ओझरती नजर टाकणारे जग आता बदलले आहे. विश्वासार्ह बातमीची चातकासारखी प्रतीक्षा केली जात आहे. याचे कारण कोरोनाच्या जागतिक साथीने वस्तुनिष्ठ अन् विश्वासार्ह माहितीचे मूल्य अधोरेखित केले आहे. या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक वृत्त दिन हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यंदा या दिनाचे तिसरेच वर्ष आहे. 

कोरोनाच्या काळात सुरक्षित कसे राहायचे, नोकरी कशी टिकवायची, कल्पित गोष्टींपासून वस्तुस्थिती वेगळी करणे, जागतिक साथीच्या जोडीला अफवा पसरण्यापासून रोखणे अशी आव्हाने वृत्तपत्रांसमोर निर्माण झाली आहेत. याचे कारण सत्य वृत्त, वस्तुनिष्ठता, समतोल आणि न्याय्य बाबींना आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यादृष्टिने जगभरातील श्रमिक पत्रकार या दिनी आणखी प्रेरित होऊन आपले काम सुरू ठेवतील.

या दिनी जगभर विविध उपक्रम साजरे केले जाणार असून त्यात टोरांटोपासून तैवान आणि स्पेनपासून सिंगापूर अशा विविध देशांमधील व्यावसायिक पत्रकार सहभागी होतील. आजचा दिवस हा स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा मात्र नक्कीच नसेल, उलट वाचक-श्रोत्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या विषयांचे वार्तांकन सक्षमपणे कसे करायचे यावरील लक्ष केंद्रीत ठेवण्याचा आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वृत्तपत्रांमुळे लढा सुकर
  वैयक्तिक स्वच्छता, सुदृढ आरोग्यविषयक तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती
  लॉकडाउन, संसर्गाच्या तीव्रतेनुसार विभागांच्या रचनेचे तपशील
  आघाडीवर लढणाऱ्या वैद्यकीय, प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा गौरव करणाऱ्या मालिका

‘फेक न्यूज’चा मुद्दा
प्रामुख्याने सोशल मीडियावरून फेक न्यूजचे प्रमाण वाढले असताना वृत्तपत्रांवरील जबाबदारी कित्येक पटींनी वाढली आहे. त्यामुळेच बातमीची खातरजमा करण्यासाठी आणखी काटेकोर नियोजनाचे आव्हान वृत्तपत्रांसमोर निर्माण झाले आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माहितीच्या महत्त्वासाठी
  उद्देश ः
पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्था विश्वासार्ह बातमीसाठी देत असलेले योगदान अधोरेखित करणे. समाजाच्या जडणघडणीतील त्यांच्या योगदानाविषयी जनजागृती करणे
  प्रणेते ः कॅनडा पत्रकारिता प्रतिष्ठान
  पार्श्वभूमी ः 2018 मध्ये या प्रतिष्ठानच्या पुढाकारानंतर गतवर्षी वर्ल्ड एडिटर्स फोरमचा सहभाग, यंदाच्या दिनासाठी गुगल न्यूज इनिशिएटीव्हकडून निधीसाठी पुढाकार
  तारखेचा संदर्भ ः माहितीच्या उपलब्धतेसाठी जागतिक पातळीवर संधी मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय दीन

प्रत्येक वृत्त विभाग आणि व्यावसायिक पत्रकार कोरोनाच्या वार्तांकनासाठी सरसावले आहेत. यंदाच्या दिनी पृथ्वीतलावरील १०० वृत्त विभागांनी या जागतिक साथीचा सामना कसा केला आणि समाजाला माहितीबाबत कसे अद्ययावत ठेवले, याची कथा आम्ही सांगू. अशा कसोटीच्या क्षणी समाजाला एकसंध ठेवणे महत्त्वाचे असते.
- वॉरेन फर्नांडेझ, वर्ल्ड एडिटर्स फोरमचे अध्यक्ष

बातमी निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे, त्यांच्या जीवनातील पत्रकारितेचा प्रभाव याची कथा ऐकण्याचा हा दिन आहे. विविध खंडांमधील लोकांनी पत्रकार तसेच त्यांच्या वाचक-श्रोत्यांनी एकत्र येणे, वस्तुस्थितीचा आधार घेणे आणि जग राहण्यासाठी सरस बनविणे असे या दिनाचे उद्देश आहेत.
- डेव्हिड वाम्सली, कॅनडा पत्रकारिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com