राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

आत्महत्या प्रकरण, आंदोलने आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये राजकीय अस्थिरता तीव्र होत आहे.
Political Turmoil Intensifies in Punjab

Political Turmoil Intensifies in Punjab

sakal

Updated on

राहुल गडपाले

पुढल्या वर्षी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि गगनदीप सिंग रंधावा आत्महत्या प्रकरणाने पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री लालजित सिंग भुल्लर यांच्यावर गगनदीप यांचा छळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी भुल्लर यांना अटक केली असून, आता मृताच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे आम आदमी पक्षाचे सरकार अडचणीत आले आहे. विरोधक या प्रकरणात कारवाई करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेमुळे पंजाबमध्ये एक प्रकारची राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ‘वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन’चा अधिकारी असलेल्या गगनदीप सिंग रंधावा यांनी भुल्लर यांच्याकडून होत असलेल्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचा आरोप केला होता. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीचे सूतोवाच केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com