
Thalapathy Vijay
Sakal
जयदीप पाठकजी
थलपती विजय यांच्या तमीळनाडूतील राजकीय भवितव्याविषयी राजकीय निरीक्षक आडाखे बांधू लागले असून सत्ताधारी द्रमुकला ते कितपत आव्हान देऊ शकतील, याची चर्चा सुरू झाली आहे. अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या आणि राजकारणात करिअर करण्यासाठी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकलेल्या विजय यांच्या सभांना, प्रचारफेऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने त्यांना टीकेचे लक्ष्य केले गेले. ते साहजिकही होते.