
Celebrating Navratri
sakal
शक्तीच्या रूपाने साक्षात परमेश्वरी देवी सर्व भूतमात्रांमध्ये स्थित असते, असे आपली भारतीय संस्कृती सांगते. शक्ती सर्वांनाच पूजनीय असते. शक्तीची विविध रूपे असतात. जीवन जगण्यासाठी पदोपदी, प्रतिक्षणी आवश्यकता असणारी शक्ती, प्रत्येक देवतेच्या मागे असणारी ‘चिद्शक्ती’, मंत्रशक्तीच्या अगोदर असणारी ‘मातृकाशक्ती’, शंकर-महादेवांच्या पलीकडे असलेली ‘पराशक्ती’, सर्व मनुष्यमात्रांचे जीवन उजळून टाकणारी ‘कुंडलिनीशक्ती’, छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देणारी ‘भवानीशक्ती’; असा हा सर्व शक्तीचा खेळ व पसारा आहे. साहजिकच वेगवेगळ्या मार्गांनी व वेगवेगळ्या वेळी या शक्तीची आठवण ठेवण्यासाठी शक्तिपूजनाचे अनेक सण असतात. त्यात सर्वांत महत्त्वाचा सण असतो ‘नवरात्र’!