पुस्तक सफर : श्रीलंकेतील यादवी आणि नौदल

श्रीलंकेतील यादवी, एलटीटीईचा उदय-अस्त आणि नौदलाची गुप्त मोहीम; निवृत्त कमांडर वसंता करन्नागोडा यांच्या अनुभवातून उलगडलेला संघर्षाचा अज्ञात पैलू
The Final Blow: Understanding the Role of Maritime Blockade in Ending the Civil War

The Final Blow: Understanding the Role of Maritime Blockade in Ending the Civil War

Sakal

Updated on

जतीन देसाई

श्रीलंकेत जवळपास २५ वर्षे ‘यादवी’ सुरू होते. लिबरेशन टायगर ऑफ तमिळ ईलमची (एलटीटीई) स्थापना १९७६ मध्ये व्ही. प्रभाकरन याने ‘तमिळ ईलम’च्या मागणीसाठी केली होती. ‘एलटीटीई’ने १९८३ मध्ये जाफना येथे लष्करावर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती वाईट होत गेली. श्रीलंकेने २००९ मध्ये ‘एलटीटीई’ चिरडून टाकली. पण त्यापूर्वी या संघटनेची प्रचंड दहशत होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडविण्यात आली. या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणे ही आव्हानात्मक बाब होती. प्रस्तुत पुस्तकात श्रीलंकेचे निवृत्त नौदल कमांडर वसंता करन्नागोडा यांनी लिहिलेली हकीकत वाचताना या संघर्षाची एक बाजू कळायला मदत होते. २००५-०९ या अतिशय कठीण काळात ते श्रीलंकेच्या नौदलाचे कमांडर होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com