
डॉ. आनंद काटीकर
बहुभाषिकता या सूत्रामुळे, अन्य देशांच्या तुलनेत भारत आजही वेगळा ठरतो. अनेक देशातल्या लोकांना केवळ एकच भाषा येते किंवा प्रामुख्याने राष्ट्रकुलातील देशांना त्यांची मातृभाषा आणि इंग्रजी भाषा ही थोडीफार कळते. भारतामध्ये पूर्वापार काळापासून माणसे बहुभाषक असल्याचे दाखले मिळतात. त्यामध्ये मातृभाषा, परिसरभाषा, ज्ञानभाषा आणि आसपासच्या प्रांतातील भाषा यांचा समावेश होता. बहुभाषिकतेच्या या सूत्राने भारत बांधला गेला आहे. याच भूमिकेतून साने गुरुजींनी आंतरभारती ही संकल्पना मांडली होती.