

Uddhav Thackeray's Shiv Sena exits MVA, new alliances on the horizon.
Sakal
दीपा कदम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. नुकतीच जिल्हापरिषदांची आरक्षणे जाहीर झाली आहेत. जानेवारी-फेब्रुवारी २०२६ पर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे सरकारी यंत्रणा निवडणुकांसाठी सज्ज होत असताना राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीदेखील आपापल्या ताकदीचा अदमास घेत आहेत. राज्यात सर्वच जिल्हा परिषदा आणि महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी योग्य त्या ‘सामंजस्या’ने महायुती निवडणुकीला सामोरी जाईल, अशी तूर्तास शक्यता वाटते. पण अशी परिस्थिती विरोधक महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेला उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वतंत्र लढण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी ‘मविआ’तून बाहेर पडून लढण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.