वादग्रस्त ‘राजपुत्रा’ची हकालपट्टी

ब्रिटनच्या राजघराण्यातून अँड्रयू यांची हकालपट्टी करून त्यांची राजपुत्र ही पदवीही काढून घेतली आहे. अनेक चुकीची कृत्ये आणि बेदरकारपणा यातून ही वेळ त्यांच्यावर ओढवली असून त्यांना शिक्षा व्हावी असेही अनेकांचे मत आहे. राजघराण्याने आत्ता कारवाई केली असली तरी शिक्षा कशी टाळायची याचे उत्तर कुणाकडेच नाही.
King Charles' Decision on Prince Andrew

King Charles' Decision on Prince Andrew

Sakal

Updated on

राहुल गोखले

ब्रिटनचे राजे चार्ल्स (तिसरे) यांनी अँड्रयू यांची ‘राजपुत्र’ ही शाही पदवी काढून घेण्याचा तसेच राजप्रासादातून त्यांना बेदखल करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे राजघराण्यावर असणाऱ्या प्रचंड दबावाचा परिणाम आहे. ६५ वर्षीय अँड्रयू हे आता माऊंटबॅटन विंडसर हे आडनाव लावतील आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून उर्वरित जीवन व्यतीत करतील. वास्तविक अँड्रयू यांचे ''प्रताप'' गेले पंधरा-वीस वर्षे चर्चिले जात होते. तरीही राजघराण्यातील सदस्याला पाठीशी घालण्याच्या मानसिकतेमुळे अँड्रयू यांच्यावर कठोर कारवाई होत नव्हती. आरोपांची पुष्टी करणारे पुढे आलेले पुरावे केवळ अँड्रयू यांचेच नाव बदनाम करीत होते असे नाही तर अप्रत्यक्षपणे राजघराण्याची देखील त्यात नामुष्की होत होती. परिणामतः अँड्रयू यांच्याबाबत कठोर निर्णय घेणे राजे चार्ल्स यांना अपरिहार्य झाले होते; अन्यथा अँड्रयू यांच्या निमित्ताने राजघराण्यावर सामान्यांचा रोष वाढला असता आणि राजघराण्याची प्रतिमा मलिन झाली असती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com