
'बार्टी', 'सारथी', या धर्तीवर अल्पसंख्याकांसाठी ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाचे महत्त्व विशद करणारा लेख.
Minority Research Training Institute Maharashtra Government
समीर शेख
अखेर 'अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था' (MRTI) स्थापन करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने २२ ऑगस्ट रोजी शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी राज्य सरकारने सात ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याची नीट अंमलबजावणी झाली तर भविष्यात हा निर्णय ऐतिहासिक तर असेलच; पण देशातील इतर राज्यांसाठीही पथदर्शक ठरेल.