esakal | कारगिल युद्ध का झाले?
sakal

बोलून बातमी शोधा

dattatray Shekatkar

कारगिल युद्ध झाल्यानंतर सैन्य दलातील सुधारणांसाठी तीन समित्या झाल्या. त्यांनी केलेल्या शिफारशींपैकी दहा टक्के कामही झालेले नाही. तीन दलांमध्ये समन्वय राहावा, यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याची शिफारस माझ्या अध्यक्षतेखाली समितीनेही केली होती. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, तीनही दलांच्या गुप्तचर यंत्रणा वेगवेगळ्या आहेत.

कारगिल युद्ध का झाले?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर
कारगिल युद्ध झाल्यानंतर सैन्य दलातील सुधारणांसाठी तीन समित्या झाल्या. त्यांनी केलेल्या शिफारशींपैकी दहा टक्के कामही झालेले नाही. तीन दलांमध्ये समन्वय राहावा, यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याची शिफारस माझ्या अध्यक्षतेखाली समितीनेही केली होती. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, तीनही दलांच्या गुप्तचर यंत्रणा वेगवेगळ्या आहेत. तीनही दलांची एकच संयुक्त गुप्तचर यंत्रणा असावी. यामुळे तीनही दलांच्या कामामध्ये आणि कारवायांमध्येही समन्वय राहील. पण, अजूनही हे घडत नाही. माझ्या मते, युद्ध नको असेल किंवा टाळायचे असेल, तर आपली संरक्षणसिद्धता सुसज्ज असली पाहिजे. त्यासाठी सैन्य दलांतील कमतरता दूर केल्या पाहिजेत. 

कारगिल युद्ध का झाले, तर पाकिस्तानला आपल्या सैन्यातील कमतरता माहिती होत्या. अजमल कसाब पाकिस्तानातून समुद्रामागे मुंबईत आला. याचा अर्थ त्यांना कुठे कमतरता आहे, याची माहिती मिळाली होती. असे प्रकार किंवा युद्धातून काही धडे घेतले पाहिजेत. कमतरता दूर करून शत्रूराष्ट्राला सैन्य दलांची संरक्षणसिद्धता दाखवून दिली पाहिजे, तरच देशावर येणारी संकटे थांबतील. त्यासाठी सैन्यशक्ती वाढविली पाहिजे, तरुण अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नवी शस्रे घेतली पाहिजेत. अनेक अर्थसंकल्पावेळी युद्धसामग्री खरेदी करण्याचे सूतोवाच केले जाते. पण, ही सामग्री काही एका रात्रीत खरेदी करता येत नाही. ती आधीच खरेदी करून ठेवली पाहिजे. पुढील काळात युद्ध कसे, कोठे आणि कधी होईल, याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. असे केले नाही, तर कारगिलसारखे युद्ध होऊ शकते.

loading image