
"Nation First, Not Socialism – RSS’s Clear Stand"
Sakal
प्रा. अशोक मोडक
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसने समाजवादी समाजरचना निर्माण करायची, हे आपले उद्दिष्ट जाहीर केले. याव्यतिरिक्त समाजवादाची निर्मिती करायची, या उद्दिष्टाने झपाटलेले काही राजकीय पक्ष भारतात होतेच. साम्यवादी पक्षही अस्तित्वात होते. संघाने मात्र ‘समाजवाद ला ना है, भूलो मत, भूलो मत...’ हा उद्घोष जाणीवपूर्वक टाळला. अर्थात १९९१ मध्ये सोव्हिएत संघ कोसळल्यावर हा उद्घोष जगामध्येच क्षीण झाला.