

November Celebrated as World Quality Month
Sakal
प्रशांत कुलकर्णी
जागतिक पातळीवर नोव्हेंबर महिना हा ‘गुणवत्ता महिना’ म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेतील अमेरिकन सोसायटी फॉर क्वालिटी (एएसक्यू) या संस्थेच्या वतीने १९६८ या वर्षापासून ही संकल्पना अंमलात आणली गेली. जागतिक पातळीवर साजऱ्या केल्या जाणाऱ्या या महिन्यात गुणवत्ता या संकल्पनेचा नव्याने विचार करण्याची संधी देतो. यावर्षीचा विषय ‘गुणवत्ता : वेगळ्या नजरेतून पाहा’ असा असून, आपल्या नेहमीच्या कार्यपद्धतींकडे नव्याने पाहण्याची प्रेरणा देणारा संदेश आहे.