मराठी 'रिती रिवाज'ची माहिती मिळवा एका क्लिकवर

Riti rivaz mobile app for ganpati
Riti rivaz mobile app for ganpati

गणेशोत्सव, गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घराघरांत आणि सार्वजिनिक मंडळांत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. या गणेशोत्सवाचे (हरितालिकाव्रत, गणेशचतुर्थीव्रत, ऋषिपंचमीव्रत, अनंतचतुर्दशी) महात्म्य तसेच श्लोक, आरत्या, प्रार्थना अगदी सहज एका क्लिक वर आता उपलब्ध आहेत.
आपल्या मराठी रिती रिवाजासंबंधी लागणारी माहिती या मोबाइल अॅप मध्ये उपलब्ध आहे. शिवाय एकदा हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर इंटरनेटची ही आवश्यकता नाही.

अॅप चे काही फायदे -
* संपूर्ण अॅप हे मराठी भाषेत उपलब्ध असून वापरण्यास अत्यंत सोपे आहे 
* अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर माहिती वाचण्यास इंटरनेट ची आवश्यकता नाही
* काही माहिती ध्वनी स्वरूपात देखील उपलब्ध आहे (५० मिनिटांचा ध्वनी उपलब्ध आहे.)
* लहान मुलांना आरत्या समजावयांस अॅप चा उपयोग होतो
* अॅप इंटरनेट शिवाय चालते त्यामुळे उपयुक्त माहिती कधीही व कुठेही वाचतां येतें 
* अॅप मध्ये फॉन्टचा आकार पाहीजे तसा कमी अथवा जास्त करता येतो 

या अॅप मध्ये पुढील माहितीचा समावेश आहे - 
श्लोक / स्तोत्र ( श्रीगणपत्यथर्वशीर्ष, संकटनाशन गणेशस्तोत्रम्, श्रीरामरक्षास्तोत्रम्, श्रीमारुतीस्तोत्र, शुभंकरोती, नवग्रहस्तोत्र), पसायदान,  भूपाळ्या, आरत्यां ( श्रीगणपतीची आरती, श्रीशंकराची आरती, श्रीदेवीची आरती, श्रीरामाची आरती, श्रीमारुतीची आरती, श्रीकृष्णाची आरती, श्रीदत्ताची आरती, श्रीपादवल्लभाची आरती, श्रीविठोबाची आरती), मंत्र, प्रार्थना, पूजे संबंधी माहिती, संख्याविशेष, आपले सण (गुढी पाडवा, राम नवमी, हनुमान जयंत, अक्षयतृतीया, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गणेशचतुर्थीव्रत, दसरा लक्ष्मीपूजन........ मकरसंक्रांती....... रंगपंचमी ..... ) शिवाय अधिकमास माहिती, अष्टविनायक, दत्तक्षेत्र , पंच महातत्वाची देवस्थाने, वारांचे उपवास व व्रते अशी खूप माहिती यात आहे. 

शिवाय पुढील माहिती ध्वनी स्वरूपात देखील उपलब्ध आहे - 
# श्लोक / स्तोत्र - मंगलाचरण, करदर्शन, भूमिवन्दन, प्रात:स्मरण, स्नान करताना म्हणावयाचे श्लोक, 
सूर्यनमस्कार, श्रीगणपत्यथर्वशीर्ष, संकटनाशन गणेशस्तोत्रम्, श्रीरामरक्षास्तोत्रम्, श्रीमारुतीस्तोत्र, तुलसीपूजन, भोजनाचे श्लोक, शुभंकरोती, नवग्रहस्तोत्र 
आरत्या - श्रीगणपतीची आरती, श्रीशंकराची आरती, श्रीदेवीची आरती, श्रीरामाची आरती, श्रीमारुतीची 
आरती, श्रीदत्ताची आरती, श्रीज्ञानदेवाची आरती, श्रीजगदीशाची आरती
मंत्र - क्लेश / पीडानाशक मंत्र, हरवलेली वस्तू सापड्यासाठीचा मंत्र, गायत्री मंत्र, मंत्रपुष्पांजली, तीर्थ घेताना म्हणावयाचे मंत्र 
प्रार्थना - घालिन लोटांगण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com