esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : भाद्रपद कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री १.२१, चंद्रास्त दुपारी २.१०, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२२, अविधवा नवमी, गुरुपुष्यामृत उत्तर रात्री १.३३ नं. सूर्योदयापर्यंत, नवमी श्राद्ध, भारतीय सौर आश्विन ८ शके १९४३.

दिनविशेष -

१९९३ - मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा, किल्लारी व औसा परिसरात भीषण भूकंप. आठ गावे भुईसपाट झाली. वीस हजारांपेक्षा जास्त लोक ठार, तर दहा हजार लोक जखमी झाले.

१९९८ - भूदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.

१९९८ - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील सेंद्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना ‘शांतिस्वरूप भटनागर’ पुरस्कार जाहीर.

१९९८ - झिंबाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मुंबईच्या अजित आगरकरने क्रेग विशार्टचा स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल पकडून एकदिवसीय सामन्यात सर्वांत जलद ५० बळी टिपण्याचा विश्‍वविक्रम केला.

१९९९ - विख्यात जर्मन लेखक ग्युंथर ग्रास यांना साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.

२००० - देशातील रासायनिक उद्योगक्षेत्राची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशन अँड केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड (सीईडब्ल्यू) या संस्थेतर्फे ‘हॉल ऑफ फेम’ हा विशेष पुरस्कार जाहीर.

दिनमान -

मेष : वैवाहिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

कर्क : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासाचे योग येतील.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : कौटुंबिक सौख्य लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

तूळ : आपल्या मताविषयी आग्रही राहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृश्‍चिक : वाहने सावकाश चालवावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनू : भागीदारीतील निर्णय मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

loading image
go to top