
सुलभा तेरणीकर - saptrang@esakal.com
मुंबईच्या चित्रनगरीत आता अमृतसर-लाहोरचे बी. आर. चोप्रा आले होते, रामानंद सागर होते. कलकत्त्याचे बिमल रॉय आले होते. नवी कथा, नवे चेहरे आणि ताजे टवटवीत मधुर संगीत मुंबईच्या चित्रनगरीचे वैशिष्ट्य झालं होतं. दक्षिणेच्या एस. एस. वासनच्या जेमिनी कंपनीने यश, पैसा, लोकप्रियतेचा हुकमी एक्का असलेल्या ‘चंद्रलेखा’च्या बळावर आर्थिक गणितं फिरवून टाकली होती. लताच्या फूल कोमल स्वरात ‘अभी तो मैं जवान हूँ’ची लकेर मात्र निनादत होती... आणि भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटातील ‘आज शिवाजी राजा झाला’चे मंगल गीत...