असं करा पॉडकास्ट सुरू...

असं करा पॉडकास्ट सुरू...

पॉडकास्ट गेल्या दशकातील सर्वाधिक वेगानं वाढणारं माध्यम (कंटेंट फॉरमॅट) असून, ते भारतात चार कोटी लोकांपर्यंत  पोचलंय. मागील भागात आपण या क्षेत्रात कोणत्या गोष्टींमुळं मोठी वाढ झाली आहे आणि कोणते बदल होत आहेत याचा आढावा घेतला आहे. या भागात आपण पाच सोप्या टप्प्यांत तुम्ही पॉडकास्टर कसे होऊ शकतो हे पाहू. पॉडकास्टर होणे फारसे अवघड नाही, मात्र ते प्रत्येकासाठीच आहे असेही नाही. पॉडकास्टचा गाभा गोष्ट सांगणे (स्टोरी टेलिंग ) एवढाच आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा, की तुम्हाला गोष्ट चांगल्याप्रकारे सांगता येते का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असल्यास तुम्ही जन्मतःच पॉडकास्टर आहात. 

आपल्याकडे एखाद्या गोष्टीची आवड असते, नैपुण्य किंवा प्रशिक्षण असते व त्यामुळे आपण त्यामध्ये उत्कृष्ट असतो. तुम्हाला नक्की काय आवडते ते शोधा. ही आवड क्रिकेट, स्वयंपाक, लेखन, अर्थज्ञान किंवा मानसोपचार यांपैकी काहीही असून शकते. तुम्हाला रस असलेली किंवा नैपुण्य असलेली कोणतीही गोष्ट तुम्ही जगाशी शेअर करता, तेव्हा तुम्हाला श्रोते मिळतातच ! पण त्यामध्ये काही अडथळेही आहेतच...  

मजकुराचे नियोजन करा : केवळ माईक हातात घेऊन ध्वनिमुद्रणाला सुरुवात करू नका. श्रोत्यांना तुम्ही जे सांगणार आहात, त्याचा आराखडा हवा आणि भविष्यात त्यात सातत्यही हवे. तुम्ही १० ते १५ मिनिटांच्या ८ ते १० भागांचे नियोजन करा. तुमच्याकडं  हे भाग चालविण्यासाठी पुरेसा मजकूर नसल्यास तुमच्या विषयाचा पुनर्विचार करा

पटकथा (स्क्रीप्ट) लिहून काढा : पटकथा मुद्यांच्या स्वरूपातही असून शकते. मात्र, ती नुसती वाचू नका, ते खूपच कृत्रिम वाटते. तुमच्याकडं मुद्दे असल्यास तुमच्या कथेचा सूर संवादी वाटतो. यामुळं तुम्ही श्रोत्यांना गुंतवून ठेऊ शकता.

संकलन आणि पॅकेजिंग - तुम्ही ‘ऑडिसिटी ’ किंवा ‘गॅरेज बॅंड’सारखे प्राथमिक सॉफ्टवेअर शिकून घेऊ शकता किंवा व्यावसायिकांकडून सेवाही घेऊ शकता. यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागत नाही, मात्र संकलन तुम्ही शिकलेले असल्यास तुमचे नियंत्रण राहते. तुम्ही पार्श्वसंगीत किंवा अंडरप्लेसाठी फ्री ऑनलाइन लायब्ररीची सेवा घेऊ शकता. 

खरेतर फारशा उपकरणांची गरज पडत नाही, तुम्ही ‘अॅंकर’सारखे मोफत व तुमच्या मोबाईल फोनवर मालिका ध्वनिमुद्रित करता येण्यासारखे उपकरण वापरू शकता. 

पुढं जात राहाल, तसे तुमचे तांत्रिक ज्ञान वाढत राहील. एक चांगला युएसबी माईक (जो तुमच्या लॅपटॉपलाही जोडता येतो.) बाजारात ६ ते १० हजार रुपयांना मिळतो. त्यामध्ये गुंतवणूक करा व पूर्ण मोकळ्या नसलेल्या जागेत ध्वनिमुद्रण करा. त्यामुळे एको आणि प्रतिध्वनी येणार नाही आणि ध्वनिमुद्रणाला स्टु़डिओचा फिल येईल. 

येथे गोष्टी काही प्रमाणात तांत्रिकतेकडं झुकतात, मात्र हेही अत्यंत सोपे आहे. तुम्हाला पॉडकास्ट होस्टिंग प्रोव्हायडरची गरज पडते. ते विविध प्रकारांमध्ये मिळतात. ‘हबहॉपर’ हा त्यातील सर्वोत्तम पर्याय आहे. ते सर्वच महत्त्वाच्या   व्यासपीठांवर उपलब्ध आहे आणि त्याचे वापरकर्तेही मोठ्या प्रमाणावर आहेत. तुम्हाला संकलनासारख्या आणखी काही सेवांची गरज असल्यास तुम्ही ‘ऑडिओवाला’सारखी सेवा घेऊ शकता. त्यामध्ये होस्टिंग, एडिटिंग आणि डिस्ट्रिब्यूशन सेवा मिळतात. तुमचा पॉडकास्ट प्रदर्शित करण्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग सातत्य राखणे हाच आहे. श्रोत्यांना ऐकण्याची सवय लागण्यासाठी वेळ लागतो आणि त्यांना ठरावीक अंतराने काही तरी ऐकायला मिळावे, अशी अपेक्षा ठेवतात. 

सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या ओळखीच्या प्रत्येकाला टॅग करा व तुमचा शो शेअर करायला सुरवात करा. त्या व्यतिरिक्त तुम्ही ऑडिग्राम्ससारखी कोणतीही हलणारी चित्रे नसलेली ट्रिक प्रसिद्धीसाठी वापरू शकता. तुमच्या शोच्या ट्रेलरसाठी याचा चांगला उपयोग होईल. त्यानंतर श्रोत्यांना तुमची मालिका कोठे ऐकायला मिळेल, हे सांगा. यासाठी तुम्ही ‘ऑडिओग्राम’, ‘हेडलायनर’ आणि ‘वेव्ह’सारख्या ऑनलाइन सेवा वापरू शकता. 

यासाठी थोडा कालावधी जावा लागतो, मात्र सातत्य आणि दर्जा राखल्यास पैसा तुमच्याकडे यायला सुरवात होते. सध्या स्पॉन्सरशिप आणि जाहिरातींच्या माध्यमातून पैसा मिळवला जातो. काही वेळ तुमच्या शोचे वितरण करण्यासाठी विचारणा होते, मात्र त्यासाठी तुमच्याकडे मोठा श्रोतृवर्ग असणे गरजेचे आहे. (प्रतिमहिना किमान एक लाख.) काही जणांनी छंद म्हणून सुरुवात करीत मोठे यशही संपादन केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com