इस्लामी आक्रमण: दुसऱ्या लाटेचा शेवटही पराभवातच

‘अजमेर इथले हिंदू आम्हाला त्रास देतात, त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा,’ अशी तक्रार तिथल्या मुसलमानांनी सन १०११ मध्ये गझनीच्या महमूदकडे केली होती.
Abhijit Jog writes Islamic Invasion hindu muslim mahmud of ghazni
Abhijit Jog writes Islamic Invasion hindu muslim mahmud of ghaznisakal
Summary

‘अजमेर इथले हिंदू आम्हाला त्रास देतात, त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा,’ अशी तक्रार तिथल्या मुसलमानांनी सन १०११ मध्ये गझनीच्या महमूदकडे केली होती.

गझनीच्या महमूदच्या प्रलयंकारी आक्रमणांमुळे भारतीयांच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला असला तरी त्यालाही अनेकदा कडव्या प्रतिकाराला सामोरं जावं लागलं आणि पराभवांचाही सामना करावा लागलं हे आपण गेल्या लेखात पाहिलं.

‘अजमेर इथले हिंदू आम्हाला त्रास देतात, त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा,’ अशी तक्रार तिथल्या मुसलमानांनी सन १०११ मध्ये गझनीच्या महमूदकडे केली होती. मुसलमानांना मदत करण्याचं महमूदनं एका अटीवर मान्य केलं. त्या मुसलमानांनी त्यांच्या शुक्रवारच्या प्रार्थनेत आपली स्तुती केली पाहिजे, अशी अट महमूदनं त्यांना घातली!

यानंतर महमूदनं त्याचा सरदार सालार साहू याच्यावर ही जबाबदारी सोपवली. साहूनं अजमेरच्या हिंदूंची कत्तल करून महमूदच्या आज्ञेचं काटेकोरपणे पालन केलं. सालार साहूवर महमूद इतका खूश झाला की, त्यानं आपल्या बहिणीचं लग्न सालारशी लावून दिलं.

Abhijit Jog writes Islamic Invasion hindu muslim mahmud of ghazni
Hindu Religion : हिंदू धर्मात चार धामांचं काय आहे महत्व? जाणून घ्या सविस्तर

सन १०१४ मध्ये या जोडप्याला मुलगा झाला - सय्यद सालार मसूद. हा मसूद गझनीबरोबर भारतावरील स्वाऱ्यांमध्ये सहभागी होत असे. मामाच्या तालमीत तयार होत असलेल्या मसूदनं महमूदचं धर्मवेड, कट्टरपणा आणि काफिरांबद्दलचा तिरस्कार या बाबी मामाकडून पुरेपूर उचलल्या होत्या.

असं म्हणतात की, अकरा-बारा वर्षांच्या मसूदनंच सोमनाथच्या शिवलिंगाच्या ठिकऱ्या उडवण्याचा हट्ट गझनीच्या महमूदजवळ धरला होता. महमूदच्या या कर्तृत्वाचे गोडवे पर्शियन काव्यात मोठ्या चवीनं गायिले गेले आहेत.

ता. ३० एप्रिल १०३० रोजी गझनीच्या महमूदचा वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी मलेरियानं मृत्यू झाला. त्यानंतर, अवघ्या सोळा वर्षांच्या मसूदनं एक लाखाचं सैन्य बरोबर घेऊन भारतावर पुन्हा एकदा स्वारी केली. गझनीच्या महमूदच्या हाताखाली त्यानं युद्धकौशल्याचे धडे घेतले होते. त्यामुळे सुरुवातीला तो भराभर विजय मिळवत गेला.

Abhijit Jog writes Islamic Invasion hindu muslim mahmud of ghazni
Hindu-Muslim : मंदिरात नमाज पढणाऱ्या अकरमला अटक; म्हणाला, "मंदिर अन् मस्जिद माझ्यासाठी एकच"

दिल्ली, मेरठ, कनौज इथं विजय मिळवत त्यानं सतरीख या ठिकाणी आपला तळ उभारला. असं म्हणतात की, प्राचीन काळी इथंच वशिष्ठ ऋषींचा आश्रम होता व या आश्रमातच त्यांनी राम व लक्ष्मण यांना शिकवलं होतं.

इथून आसपासच्या राज्यांवर स्वाऱ्या करून ती राज्ये जिंकून घेण्याची मसूद याची योजना होती. त्यापैकी एक राज्य होतं श्रावस्ती (सध्याचं गोरखपूर-बहराईच). या राजवटीवरील स्वारीची तयारी तो करू लागला. श्रावस्तीचा राजा सुहेलदेव यानं सीतापूर, बाराबंकी, उन्नाव, फैजाबाद, बहराईच, गोंडा इथल्या २१ छोट्या-मोठ्या राजवटी एकत्र आणून मोठं सैन्य उभ केलं.

परमार राजवंशाचा सुप्रसिद्ध राजा भोज याचाही यात समावेश होता. सतरीखहून मसूदनं विविध दिशांना आपले सरदार सैन्यासह रवाना केले. यापैकी रेवारीजवळ धुंदगढच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला त्याचा सरदार दोस्त मोहंमद याचा ‘अधिक कुमक पाठवावी,’ असा निरोप आला. मसूदनं त्याचा सूफी धर्मगुरू सय्यद इब्राहिम हजारी याला तिकडे पाठवलं.

Abhijit Jog writes Islamic Invasion hindu muslim mahmud of ghazni
Pune News : आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील 55 महा-ई सुविधा केंद्र शनिवारी व रविवारी सुरू राहणार - गोविंद शिंदे

जो काफीर ‘इस्लाम कबूल’ करणार नाही त्याला ‘नरका’त पाठवण्यासाठी हा सूफी ख्यात होता; पण रेवारीमधील लढाईत हाच सूफी सय्यद ठार झाला. गझनीच्या फौजांनी केलेले जुलूम आणि मंदिरांचा विध्वंस याच्या कहाण्या सुहेलदेवनं ऐकल्या होत्या. आपल्या प्रदेशात हे होऊ द्यायचं नाही असा त्याचा निश्चय होता. त्यानं मसूदला निरोप पाठवला, ‘हिंदू लोकांची भूमी सोडून तू निघून जा.’

त्यावर मसूदनं उत्तर दिलं, ‘ अल्लानं सगळी पृथ्वी मुसलमानांना दिली आहे. मी कुठंही जाणार नाही.’

शेवटी, ता १३ जून १०३४ रोजी हिंदू आणि तुर्क यांच्या विशाल सेना बहराईचजवळील चितौरा झील इथं एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. हिंदू सैन्याचा अंदाज घेऊन तुर्कांचा सेनापती सालार सैफुद्दीन यानं जादा कुमक पाठवण्याची विनंती मसूद याला केली. यानंतर तुर्कांचा दुसरा एक महत्त्वाचा सरदार सालार मियाँ रज्जब ठार झाला.

युद्धाचा रागरंग बघून स्वतः मसूद मोठी कुमक घेऊन रणांगणात उतरला. संध्याकाळपर्यंत तुंबळ लढाई झाली. शेवटी, तुर्की फौजांचा पराभव झाला. सुहेलदेवनं कुठलीही दयामाया न दाखवता गझनीच्या सैन्याची कत्तल केली.

Abhijit Jog writes Islamic Invasion hindu muslim mahmud of ghazni
Mahavitaran Worker Protest : नियमबाह्य बदल्या थांबविण्यासाठी कामगारांचे धरणे सुरू

दुसऱ्या दिवशी ता. १४ जून रोजी पवित्र सूर्यकुंडाजवळ स्वतः मसूदही मारला गेला. या प्रलयंकारी युद्धानंतर तुर्कांनी जो पळ काढला तो पुढील दीडशे वर्षं त्यांनी भारताकडे डोळे वर करून पाहिलं नाही. तुर्कांनी आजवर केलेल्या कत्तलीचा बहराईचमध्ये पुरेपूर बदला घेतला गेला.

राजा सुहेलदेव याच्या या महापराक्रमी कामगिरीचा आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये उल्लेखही नाही. त्याचं नावही आपण आजवर ऐकलेलं नव्हतं. प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांनी नुकतीच त्याच्या जीवनावर ऐतिहासिक कादंबरी लिहून भारतभूमीच्या या सुपुत्राला, उशिरा का होईना, पण काही प्रमाणात न्याय देण्याचा प्रयत्न केला. अर्थात ही कादंबरी असल्यामुळे तीत अनेक काल्पनिक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मात्र सुहेलदेवच्या स्मृतीकडे दुर्लक्षच करण्यात आलेलं आहे. अशा रीतीनं सन ६३६ मध्ये ठाण्यावर केलेल्या पहिल्या हल्ल्यानंतर ४०० वर्षं झाली तरी सन १०३४ पर्यंतही इस्लामी आक्रमकांना भारतात आपलं राज्य स्थापन करणं शक्य झालं नाही. आपण याआधी पाहिलं त्यानुसार, निम्म्याहून अधिक जगावर अवघ्या १२५ वर्षांत त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं होतं.

या तुलनेत भारतात त्यांना आलेलं अपयश हा भारतीयांनी केलेल्या कठोर संघर्षाचा परिणाम होता; पण आपल्याला मात्र हेच शिकवण्यात आलं की, भारताचा इतिहास हा फक्त पराभवांचा इतिहास आहे.

डाव्या इतिहासकारांचा एक लाडका सिद्धान्त असा की, भारतातील उच्च जातींच्या जाचाला कंटाळलेल्या बहुजन समाजानं मुस्लिम धर्मातील बंधुभावाच्या शिकवणुकीमुळे प्रभावित होऊन मुस्लिम आक्रमकांचं स्वागतच केलं.

या सिद्धान्ताचा खोटेपणा उघडा पाडण्यासाठी बहराईचा हा एकच विजय पुरेसा आहे. राजा सुहेलदेव हा मागास समजल्या गेलेल्या पासी समाजातला होता, तसंच त्यानं एकत्र आणलेले बहुतेक सर्व राजे बहुजन समाजातील विविध जातींचं प्रतिनिधित्व करणारेच होते.

संबंध असो वा नसो, प्रत्येक बाबतीत जातीयवाद आणून भारतातील लोकांमध्ये सतत फूट पाडत राहण्याचं डाव्यांचं कारस्थान आणि ते अमलात आणण्याच्या निश्चयाशी असलेली त्यांची बांधिलकी यांच्यामुळे भारताच्या इतिहासकथनात खोटेपणा आणि दिशाभूल यांचा अतिरेक झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात : ‘इस्लाम ही एक बंदिस्त संघटना आहे, जी मुस्लिम आणि मुस्लिमेतर यांच्यात सतत जाणवणारा आणि दुजाभाव निर्माण करणारा असा फरक करते. इस्लामचा बंधुभाव हा माणसामाणसातला वैश्विक बंधुभाव नसून फक्त मुस्लिमांचा मुस्लिमांसाठी असलेला बंधुभाव आहे.

संघटनेच्या बाहेर असलेल्यांसाठी इथं फक्त तिरस्कार आणि शत्रुत्वच आहे.’ इस्लामचा बंधुभाव फक्त मुस्लिमधर्मीयांसाठी आहे या बाबासाहेबांच्या म्हणण्याचा अनुभव बहुजन समाजातील लोकांनी पुरेपूर घेतला होता.

मुस्लिम आक्रमकांचे जुलूम, अत्याचार आणि कत्तली यांत भारतातील सगळेच लोक भरडले गेले होते. त्यामुळे आक्रमकांविरुद्ध केलेल्या संघर्षात सर्व जाती-जमातींचा सहभाग होता. इतिहास सांगताना मात्र हे सत्य दडपून टाकण्यात आलं आणि त्याच्या विरुद्ध चित्र उभं करून दिशाभूल करण्यात आली.

सालार मसूदच्या मृत्यूनंतरचा इतिहास ही हिंदूंच्या सद्गुणविकृतीची आणि भारतभर तथाकथित सूफी संतांचे दर्गे कसे उभे राहिले याची थक्क करणारी कहाणी आहे. एक दंतकथा अशी सांगितली जाते की, सालार मसूदच्या सतरीख इथल्या तळावर जोहराबीबी नावाची एक अंध मुलगी त्याला भेटायला आली होती.

अचानक असा चमत्कार झाला की, मसूदनं तिचं अंधत्व दूर केलं. यानंतर मसूद तिच्या प्रेमात पडला आणि त्यानं तिच्याशी लग्न केलं. बहराईचच्या लढाईत सूर्यकुंडाजवळ मरता मरता त्यानं अशी इच्छा प्रदर्शित केली होती की, सूर्यदेवतेची मूर्ती उद्ध्वस्त करून तिच्या खाली त्याला पुरण्यात यावं.

बाराव्या शतकाच्या शेवटी महंमद घोरीच्या विजयानंतर जेव्हा दिल्ली-सल्तनत स्थापन झाली, तेव्हा त्याची ही इच्छा पूर्ण झाली. यानंतर, त्यानं चमत्कार करून ‘जोहरादेवी’ची दृष्टी परत आणली होती...या दंतकथेच्या साह्यानं त्याच्या आठवणीभोवती संतपदाचं वलय निर्माण करण्यात आलं आणि त्याला गाझी मियाँ या नावानं ओळखलं जाऊ लागलं.

सर्वसामान्य जनतेला मुक्तीचा मंत्र देणारा महात्मा म्हणून त्याचा उदो उदो सुरू झाला. अशा प्रकारे एका धर्मांध, अत्याचारी आक्रमकाचा आध्यात्मिक वलय असलेला संत झाला. हा प्रकार बघून थक्क झालेला एकोणिसाव्या शतकातला एक ब्रिटिश अधिकारी विल्यम हेन्री स्लीमन त्याच्या ‘स्लीमन इन औध’ (Sleeman in Oudh) या ग्रंथात म्हणतो, ‘सांगायला विचित्र वाटतं की, हिंदू व मुसलमान या दर्ग्याला भेटी चढवतात आणि अशा एका लष्करी गुंडाला नवस बोलतात, ज्याची एकमेव ओळख म्हणजे, त्यानं हिंदूंच्या प्रदेशावर विनाकारण आक्रमण करून अनेक हिंदूंचा विध्वंस केला.’

दरवर्षी त्याच्या पुण्यतिथीला त्याच्या दर्ग्यावर उरूस भरू लागला व हिंदूही त्यात मोठ्या संख्येनं सहभागी होऊ लागले. साधारणतः शंभरेक वर्षांत भक्तांची संख्या इतकी वाढली की जागा कमी पडू लागली; तसे आसपासच्या फैजाबाद, सतरीख, रुदौली यांसारख्या गावांमध्ये दर्गे उभे राहू लागले.

अयोध्येजवळच्या एका गावाचं नावच त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सालारगढ’ असं ठेवण्यात आलं. मसूदच्या वडिलांची कबर सतरीख इथं होती. तिथंही उरूस भरू लागला व त्या कबरीला ‘बूढे बाबा की मजार’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ठार झालेल्या त्याच्या प्रत्येक सरदाराच्या नावानं मकबरे बांधण्यात आले.

मियाँ रज्जब आणि अजीजुद्दीन (लाल पीर) यांच्या कबरी कनौज इथं उभ्या राहिल्या, तर बुऱ्हानुद्दीनची कबर सीतापूर इथं उभारण्यात आली. रुदौली इथं आजही दरवर्षी ‘जोहरा मेला’ भरवण्यात येतो व भक्तगणांनी तिथल्या दर्ग्याला दिलेल्या देणग्या म्हणजे ‘जोहराचा हुंडा’ आहे असं मानलं जातं. इस्लाम धर्मात मुलींना अभिनय करण्याची बंदी असल्यामुळे बहराईच इथल्या उरसात दोन मुलं मसूद आणि ‘जोहरादेवी’ यांची प्रेमकथा रामलीलेप्रमाणे सादर करतात.

अशा रीतीनं धर्मांध आक्रमक मसूद व त्याचे सहकारी यांच्या आठवणी बहराईच व आसपासच्या प्रदेशात संत म्हणून जपल्या गेल्या, तर त्यांच्या अत्याचारांना पायबंद घालणाऱ्या सुहेलदेवचं साधं नावही शिल्लक राहिलं नाही.

शेवटी, जिथं बहराईचची लढाई झाली होती त्या ठिकाणी फेब्रुवारी २०१६ मध्ये सुहेलदेवचा पुतळा उभारण्यात आला. विशेष म्हणजे, सुमारे एक हजार वर्षांनंतर सुहेलदेवची आठवण जपण्यासाठी उचललेल्या या छोट्याशा पावलाविरुद्धसुद्धा डाव्या माध्यमांनी मोठा गदारोळ केला. ही आहे भारतातील इतिहासलेखनाची आणि सेक्युलॅरिझमची विकृत व्याख्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com