

Lionel Messi India Visit
esakal
भारतीय चाहत्यांनी भरभरून दिलेले प्रेम घेऊन फुटबॉल जगताचा तारा लियोनेल मेस्सी अमेरिकेत परतला. सगळीकडे त्या त्या गावचे संयोजक आपापले ढोल वाजवत असताना मेस्सीच्या भेटीवर महान खेळाडू अभिनव बिंद्राने केलेली टिप्पणी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी होती. त्याबद्दल आणि सोशल मीडियावर मन हेलावून टाकणाऱ्या एका चित्रफितीबद्दल...
नुकताच संपलेला आठवडा खेळाच्या दुनियेतला खूप धामधुमीचा होता. फुटबॉल जगताचा तारा लियोनेल मेस्सी भारतात येऊन गेला. चैतन्याचे जणू उधाण आले होते चाहत्यांच्या उत्साहाला. त्याच्या भेटीच्या चार दिवसांत भारतातील तमाम वर्तमानपत्रातील खेळाच्या पानांवर मेस्सी झळकत होता. सोशल मीडिया मेस्सीच्या बातम्यांनी वाहून गेले. भारतीय चाहत्यांनी भरभरून दिलेले प्रेम घेऊन मेस्सी अमेरिकेत परतला. सगळीकडे त्या त्या गावचे संयोजक आपापले ढोल वाजवत असताना मेस्सीच्या भेटीवर महान खेळाडू अभिनव बिंद्राने केलेली टिप्पणी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी होती. त्याच बद्दल आणि नंतर सोशल मीडियावर मन हेलावून टाकणाऱ्या एका क्लिपबद्दल आजच्या लेखात विचार मांडणार आहे.