

Introducing 'Limelight Pradesik' by Godbole and Kulkarni
Sakal
संपदा सोवनी
चित्रपट हा लोकप्रियतेचे सर्व भौतिक निकष पूर्ण करणारा असला, तरी त्याला प्रेक्षक डोक्यावर घेतीलच असे खात्रीने सांगता येत नाही. प्रेक्षकाला बांधून ठेवणारा आणि पडद्यावर घडते आहे, त्याची प्रेक्षकाच्या स्वत:च्या आयुष्याशी दुरान्वयाने का होईना, जोडणी करणारा भावनेचा एक तरी धागा त्यात असावा लागतो. परंतु, रूढ अर्थाने यशस्वी न ठरलेल्या काही चित्रपटांत भावनांच्या अशा धाग्यांचे वस्त्रच विणलेले असते. अशा चित्रपटांना मोठे यश का मिळत नाही, कारण ‘चित्रपट कसा बघावा?’ हे अजून व्यापक प्रमाणात पोहोचलेले नाही. चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमांना जाणारी नवी मंडळी ‘काय बघायचे ते कळले आणि चित्रपट मनाला भिडला,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करतात, ती यामुळेच! हे काम बऱ्याच अंशी करणारे पुस्तक आहे - ‘लाईमलाईट प्रादेशिक - प्रादेशिक सिनेमांची अनोखी सफर.’