

Milind Shinde Saptarang Article
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
‘फुलराणी’चा प्रयोग ठाण्यात होता. मी मुंबईतून लोकलने प्रवास करत निघालो; पण टीसीला पास दाखवण्यात बराच वेळ दादरलाच लटकलो. बऱ्याच उशिरा नाट्यगृहात पोहोचलो, तेव्हा प्रयोग सुरू होत होता. मेकअप रूममध्ये सगळे माझ्याकडे पाहत होते. त्यातले काही ‘आता तुझी मजा आहे’, ‘तुझं बघ आता काय होतंय ते’ असे चेहरे करून होते. प्रयोग हाऊसफुल्ल होता. पार पडला. दरम्यान, ‘चारशे तीस सव्वीस ऐंशी या नंबरला फोन कर’, मॅनेजरने दरडावलं. तो मोहन वाघ यांचा फोन नंबर होता...
‘कोण झोपडपट्टीतला...?’ ‘तोच तुमच्या नाटकातला. तुम्ही झोपडपट्टीतल्या माणसांना काम देता मग आम्हाला का नाही? आम्ही किती वर्षे झाली थिएटर करतोय... आम्हाला पण द्या ना चान्स.’ वामन सर (की गौरी केंद्रे) यांनी त्या व्यक्तीला उत्तर दिलं की, ‘तो मिलिंद शिंदे नावाचा एनएसडी, एफटीईई करून आलेला मुलगा आहे... इत्यादी इत्यादी.’ नंतर हा प्रसंग एका मोठ्या वर्तमानपत्रात ‘विंगेत गलबला’ या सदराखाली छापून आला होता.