

Milind Shinde Actor Biography
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
एनएसडी, एफटीआयआय यांसारख्या संस्थांमधलं शिक्षण, त्यानंतर मुंबईच्या कलाविश्वातली धडपड, चांगली दोन नाटकं. विनय आपटे, मोहन वाघ यांच्यासारख्या दादा मंडळींचा स्नेह... असं सारं असताना वडिलांना हार्टॲटॅक आल्यामुळे अभिनेते मिलिंद शिंदे यांना अचानक प्रयोग संपवून मुंबईतून गावी यावं लागतं. काय घडलं त्यावेळी आणि त्यानंतर, त्यांच्या आयुष्यात नेमके काय बदल झाले... अनोखा प्रवास आणि हृद्य आठवणींचा सारा कालपट उलगडत आहेत स्वतः मिलिंद शिंदे...
डॉक्टर माझ्याकडे पाहात होते…
त्यांनी घेतलेला पॉज मला विनाकारण मोठा वाटू लागला. खरं तर जास्त वेळ थांबले व ... पण मला त्यांच्याकडून वडिलांच्या स्वास्थ्याबद्दल ऐकायची ओढ लागली होती. काय सांगतायेत कोण जाणे...? मग मीच पुढाकार घेऊन तो पॉज तोडून बोललो,
‘फार सीरियस आहे का?’
‘नाही फार नाही. पण...’
नाही फार नाही... म्हणल्यावर मी थोडा सैलावलो पण लगेच ते ‘पण’ म्हणाले आणि पुन्हा काळजी दाटली.