सेलेब्रिटी वीकएण्ड : आवडत्या गोष्टींसाठी वेळ देते.... 

रुपाली भोसले, अभिनेत्री 
Friday, 28 August 2020

वीकएण्ड कसा घालवते हे सांगताना ती म्हणाली, ‘लॉकडाउनमुळे सगळी चित्रीकरण थांबवली होती. त्यामुळे आता जवळजवळ तीन-साडेतीन महिन्यांनी पुन्हा एकदा कामाला जोमाने सुरुवात झाली आहे.

रुपाली भोसलेने अनेक मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. मराठी बिग बॉस सिझन-२ मध्येही आपण तिला स्पर्धक म्हणून पाहिले. आता ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वीकएण्ड कसा घालवते हे सांगताना ती म्हणाली, ‘लॉकडाउनमुळे सगळी चित्रीकरण थांबवली होती. त्यामुळे आता जवळजवळ तीन-साडेतीन महिन्यांनी पुन्हा एकदा कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. बऱ्याचदा वीकएण्ड सेटवर शूटिंग करण्यात जातो. मला सुट्टी असते, तेव्हा घरी राहून, घरातली काही कामंकरून तो वेळ मी माझ्या घरच्यांबरोबर घालवते. सुट्टीच्या दिवशी मला उशिरापर्यंत झोपून रहायला, सगळे आरामात आवरायला आवडत नाही. मी फिटनेस फ्रिक आहे. रोजच्या बिझी शेड्युलमुळे व्यायाम करायला तितका वेळ नाही मिळत. मी घरी असताना न चुकता व्यायाम करते. सकाळी साडेपाच ही माझी जिमला जाण्याची ठरलेली वेळ असते. त्यामुळे उशिरा उठण्याचा प्रश्नच येत नाही. एरवी जेव्हा मला सकाळी लवकर शूटिंगला जायचे असल्यास आई चहा आणि जेवण बनवते. परंतु मी घरी असताना माझा प्रयत्न तिला आराम देण्याचा असतो. म्हणून सकाळी उठून चहा करणे, स्वयंपाक करणे, घरातली इतर काही कामे करणे, काही सामान आणणे हे मी आवर्जून करते. कुकिंग हे माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. नवनवीन पदार्थ बनवायला मला प्रचंड आवडते. माझा स्वतःचा यू-ट्यूब चॅनल आहे, ज्यावरून मी वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करत असते. त्यामुळे जेव्हा मी घरी असते तेव्हा वेगवेगळे पदार्थ बनवणे, ते शूट करून शेअर करणे हे कामही सुरू असते.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भटकंतीविषयी ती सांगते, ‘‘सुट्टीच्या दिवशी मी शक्यतो प्रवास टाळते. मी विरारला राहते आणि माझ्या मित्र-मैत्रिणी गोरेगाव, मालाड या ठिकाणी राहतात, त्यामुळे वीकएण्डला मुद्दाम त्यांना जाऊन भेटणे शक्य नसते. एरवी आमचे भेटणे-बोलणे होत असल्याने तो वेळ मी घरच्यांना देते. आम्ही भरपूर गप्पा मारतो, अनेक गोष्टी घाई गडबडीत सांगायच्या राहून गेलेल्या असतात, त्या एकमेकांसोबत शेअर करतो. रोजच्या बिझी शेड्युलमध्ये बॉयफ्रेंडलाही तितका वेळ देता येत नाही. मग सुट्टीच्या दिवशी मी त्याला भेटते. आम्ही छान गप्पा मारतो, कुठेतरी फिरायला जातो, चित्रपट किंवा नाटके बघतो. मला चित्रपट, नाटके बघायला फार आवडतात. दुसऱ्यांचे काम पाहूनही आपल्याला त्यातून बरेच काही शिकायला मिळते. त्यामुळे आपलं काम आणखीन वेगळे आणि छान कसे होईल हेही प्रत्येक कलाकृती पाहून आपण नव्याने शिकत असतो. या मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करून मी माझा वीकएण्ड घालवते.’’ 

(शब्दंकन - राजसी वैद्य) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress rupali bhosale article Gives time for favorite things