सूर निरागस हो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 music

सूर निरागस हो!

‘‘कसला बेसूर गातोस तू!’’ संस्कृती तोंडावर हात ठेवून हसू आवरत म्हणाली. ‘‘असू दे. मनापासून गातो ते महत्त्वाचं,’’ आनंद खुनशी लुक तिला देत उत्तरला.‘‘अरे पण त्यात इतरांच्या मनाला दुखापत होतीये ना, तुझ्या कर्कश आवाजानं.’’ ‘‘‘हे बघ, तुला वाटत असेल की तुझ्या बोलण्यानं मला फरक पडेल, तर सॉरी! तू पहिली व्यक्ती नाहीयेस मला हे सांगणारी, की माझा आवाज गाण्यासाठी बकवास आहे,’’ आनंदनं डोळ्यावर गॉगल चढवला आणि स्टाईलमध्ये गाडी चालवत म्हणाला. संस्कृती गालातल्या गालात हसत राहिली.

‘‘तुझं सगळ्यात आवडतं गाणं कुठलं?’’ ‘‘तुला ओळखता नाही येणारे, पण तरी तुझ्या अंदाजे कुठलं असेल माझं आवडतं गाणं?’’ संस्कृतीनं थोडा विचार केला. ‘‘अम्म... तुझ्याकडं बघता मे बी ‘स्वदेस’मधलं ‘युहीं चला चल राही?’ किंवा ‘दिल चाहता है’मधलं ‘कोई कहे कहता रहे?’ बरोबर?’’ तिनं विचारलं. ‘‘नॉट बॅड, नॉट बॅड! म्हणजे ही गाणी तर आवडतातच गं, पण स्टील ही गाणी माझी ॲब्सोल्यूट फेव्हरेट नाहीत.’’

‘‘अच्छा...’’

‘‘अच्छा काय अच्छा? विचार ना पुढं कुठलं आहे मग माझं ॲब्सोल्यूट फेव्हरेट गाणं!’’ आनंद ओठ उडवत म्हणाला. संस्कृती जोरजोरात हसायला लागली. ‘‘कसला उचकतो रे तू लगेच! किती ते अटेन्शन लागतं तुला!’’ ती फिदीफिदी हसत म्हणाली. ‘‘तुम्हा पोरींना ते अटेन्शन सर्रास मिळतं ना, म्हणून तुम्हाला काही नाही त्याचं अप्रूप. कदरलेस कुठली!’’ ‘‘बरं बरं! सांगा आता कुठलं आहे तुमचं आवडतं गाणं?’’ ती तशीच हसू आवरत म्हणाली. ‘‘तू विद्या बालनचा ‘बॉबी जासूस’ पाहिला आहेस?’’

‘‘नाही.’’

‘‘गुड! मी पण नाही पाहिला, पण त्यातलं एक सुंदर गाणं आहे. गाण्याचं नाव ‘तू’ आहे.’’ ‘‘अच्छा. पण का आवडतं हे इतकं गाणं?’’ ‘‘अगं, काय सुंदर लिरिक्स आहेत त्यात अहाहाहा...

’’ तू मेरा अफ़साना, तू मेरा पैमाना

तू मेरी आदत, इबादत है तू

तू मेरा मुस्काना, तू मेरा घबराना

तू मेरी गुस्ताखी, माफ़ी भी तू"

आनंद गुणगुणून दाखवतो. ‘छाने! पण फक्त शब्दांसाठी एखाद्याला इतकं एखादं गाणं आवडू शकतं...?’’ संस्कृतीनं विचारलं. आनंदनं पुन्हा गाडी चालवताना मान वळवून शेजारी तिच्याकडे पाहिलं. ‘‘बरोबर! हे गाणं फक्त लिरिक्ससाठी स्पेशल नाहीये. हे ज्या व्यक्तीनं मला पाठवलं होतं त्या व्यक्तीमुळं स्पेशल आहे.’’

‘‘ओहोsss!’’

‘‘पहिलं प्रेम, पहिलं क्रश किंवा पहिली घोडचूक... काहीही म्हणा... त्यांनी दिलेलं सगळंच खास असतं नाही का?’’ आनंद म्हणाला. संस्कृती हे वाक्य ऐकून छान हसली. ‘‘किती सहज शेअर करतोस मनातलं... अगदी स्पेशल गाणं सुद्धा!’’ ‘‘आयुष्यातलं स्पेशल गाणं आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तिंसोबतच तर शेअर करायचं असतं,’’ आनंद संस्कृतीकडं न बघताच थोडं ऑक्वर्ड होऊन म्हणाला. ती पण थोडी ऑक्वर्ड झाली, पण तरी छान स्माईल देत म्हणाली, ‘‘इतकं कौतुक केलं आहेस गाण्याचं, आता लावच ते लगेच."

‘‘चालेल!’’

‘‘हां पण...’’ ‘‘आय नो आय नो... मी नाही गाणार! चील.’’

‘‘पण मी कुठं असं म्हणतीये की तू गाऊ नकोस? उलट मला म्हणायचं होतं की हे गाणं पण तू बिंदास गाणार असशील तरंच लाव!’’ ती एका गालात स्माईल देत म्हणाली.

‘‘खरंच?’’

‘‘हो खरंच! झाली आता मला सवय तुझ्या बेसुऱ्या आवाजाची...’’ ते दोघंही हसतात आणि गाणी म्हणत पुढचा प्रवास सुरू राहतो.

सब गाते हैं सब ही मदहोश हैं

हम तुम क्यों ख़ामोश हैं

साज़े दिल छेड़ो ना

चुप हो क्यों गाओ ना!

Web Title: Aditya Mahajan Writes About Music

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..