Premium|AI Data Centers : एआय डेटा सेंटर्सचा महाविस्तार; वीज‑पाण्याचा प्रचंड वापर, पर्यावरणावर वाढता ताण आणि ‘डिजिटल वसाहतवाद’चा धोका

Global AI Infrastructure : एआयच्या वाढत्या वापरामागे हजारो शक्तिशाली संगणक, जीपीयू आणि शीतकरण यंत्रणांनी सज्ज डेटा सेंटर्सचा मोठा आधार आहे; अमेरिकेसह भारतातही या प्रचंड पायाभूत सुविधांचा विस्तार वेगाने होत आहे.
Global AI Infrastructure

Global AI Infrastructure

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर - saptrang@esakal.com

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फक्त चॅट जीपीटी, जेमिनाय किंवा इतर एआय मॉडेल्स नाहीत. त्यामागे जगभर पसरलेली प्रचंड मोठी संगणकीय यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेचा कणा म्हणजेच डेटा सेंटर्स. डेटा सेंटर म्हणजे हजारो किंवा लाखो सर्व्हर्स, स्टोरेज सिस्टिम्स, नेटवर्क उपकरणं आणि त्यांना थंड ठेवण्यासाठी लागणारी शीतकरण यंत्रणा (कूलिंग सिस्टिम्स) या सगळ्या गोष्टी असलेली मोठी इमारत किंवा इमारतींचा समूह. एखाद्या मोठ्या ग्रंथालयात लाखो पुस्तकं असतात, तसं डेटा सेंटरमध्ये अब्जावधी डिजिटल माहितीचे तुकडे (टोकन्स) आणि त्यांच्यावर प्रक्रिया करणारे शक्तिशाली संगणक असतात.

अमेरिका केंद्रस्थानी

आज एआयचा सगळ्यात मोठा खर्च हा सॉफ्टवेअरवर नसून अशा डेटा सेंटर्सवर होतो. चॅट जीपीटी सारखं मोठं मॉडेल तयार करायचं असेल तर आपण आपल्या लॅपटॉप वर वापरतो तसे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स म्हणजेच सीपीयूज पुरे पडत नाहीत. त्यासाठी त्यांच्यापेक्षा प्रचंड ताकदवान ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स म्हणजेच जीपीयूज लागतात आणि असे हजारो जीपीयूज अनेक आठवडे किंवा महिने सतत चालवावे लागतात. त्यानंतर ते मॉडेल दर क्षणी वापरणाऱ्या लाखो करोडो लोकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीही हीच डेटा सेंटर्स दिवस-रात्र काम करत असतात. त्यामुळे एआयचा खरा ‘कारखाना’ म्हणजे डेटा सेंटर्स. आज जगात सुमारे ११ हजारापेक्षा जास्त डेटा सेंटर्स आहेत. त्यापैकी जवळपास ५ हजार ५०० हून अधिक अमेरिकेत आहेत. जर्मनी, ब्रिटन, चीन, जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नेदरलँड्स, सिंगापूर आणि भारत हे देशही अशा डेटा सेंटर्ससाठी मोठी केंद्र बनताहेत. पूर्वीही अनेक कॉम्प्युटर्स आणि सर्व्हर्स असणारी क्लाऊड डेटा सेंटर्स होतीच. पण आता सर्वसाधारण क्लाउड डेटा सेंटरपेक्षा प्रचंड जास्त अजस्त्र असणारी ‘एआय डेटा सेंटर्स’ वेगानं वाढत आहेत. अनेक नव्या एआय डेटा सेंटर्समध्ये एकाच ठिकाणी १ लाख किंवा त्याहून अधिक जीपीयूज बसवले जाताहेत. काही ठिकाणी भविष्यात दहा लाख जीपीयूज असलेले कॅम्पस उभे करण्याची योजनाही आहे.

वीजवापराचे गणित

या क्षेत्रात सर्वात आघाडीवर मायक्रोसॉफ्ट, गूगल, अमेझॉन, मेटा, ओपन ए आय, ओरॅकल, एनव्हिडिया, एक्स ए आय आणि चीनमध्ये अलीबाबा, टेंसेन्ट, हुआवे आणि बायडू अशा कंपन्या आहेत. या कंपन्या मिळून पुढच्या काही वर्षांत शेकडो अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. पण यामागे एक प्रचंड मोठी समस्या आहे. ही डेटा सेंटर्स सतत चालू ठेवावी लागतात आणि ती प्रचंड वीज खातात. साधारणपणे एक लाख लोकसंख्या असलेल्या शहराला जितकी वीज लागते, तितकी वीज एखादं मोठं एआय डेटा सेंटर एकटंच वापरू शकतं. काही नव्या प्रकल्पांची मागणी ५०० मेगावॅट ते एक गिगावॅट इतकी आहे. हे म्हणजे मध्यम आकाराच्या वीज प्रकल्पाइतकी आहे.

Global AI Infrastructure
Premium|AI and Sustainability History : ‘एआय’ आणि शाश्वत विकास; पृथ्वी वाचवणारे अस्त्र की मानवी रोजगारावर कुऱ्हाड?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com