
जाणून घ्या, अक्षय्य तृतीयेमागील शास्त्र आणि परंपरा
सोनं (gold) खरेदी करायचा खास दिवस किंवा मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहिलं जातं. हा दिवस शुभ असल्यामुळे कोणत्याही नव्या कामाची सुरुवात, एखादी खरेदी या दिवशी केली जाते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या अक्षय्य तृतीया (akshaya tritiya) हा सण हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परंतु, या दिवसाचं नेमकं महत्त्व काय, या दिवसामागचं शास्त्र किंवा परंपरा काय हे फार कमी जणांना माहित आहे. म्हणूनच त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात. (akshaya tritiya 2021 know everything about akshaya tritiya)
अक्षय्य तृतीयेला चैत्र शुद्ध तृतीयादेखील म्हटलं जातं. हा अर्ध्या शुभमुहूर्त कृतयुगाचा आरंभदिन मानला जातो. तर, काहींच्या मते, हा दिवस त्रेतायुगाचा आरंभदिन आहे. परंतु, या दिवसामागची नेमकी कहाणी काय ते पाहुयात.
हेही वाचा: Covid-19 : दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घेतल्यास काय होतं?
जाणून घ्या, अक्षय्य तृतीयेची कहाणी
असं म्हटलं जातं, ऋषभ देवाने याच दिवशी हस्तिनापूरचा राजा श्रेयास याच्या घरी जाऊन उसाच्या रसाचे प्राशन करुन उपवास सोडला होता. त्यामुळे श्रेयास राजाची भोजनशाळा अक्षय्य झाली होती. म्हणूनच, वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय्य तृतीया हे नाव पडलं.
अक्षय्य तृतीयेला काय करतात?
या दिवशी स्वच्छ आंघोळ करुन भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी त्याची पूजा केली जाते. घरात होमहवन, जप, पितृतर्पण केलं जातं. तसं, अनेक जण या दिवशी पुण्यकर्म करतात. गरजुंना मदत करतात किंवा मुक्या प्राण्यांना खाऊ घालतात. त्यांना पाणी पाजतात.
Web Title: Akshaya Tritiya 2021 Know Everything About Akshaya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..