

Artificial Intelligence
sakal
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा शब्द आपल्या आता सवयीचा झाला आहे. ‘एआय’चा शोध हा अलीकडच्या काळातच लागला असावा किंवा ही अचाट कल्पना हल्लीच कोणाच्यातरी डोक्यात आली असावी असाच अनेकांचा समज आहे. मात्र, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच एका अवलियाने याबाबत विचार करून त्या दृष्टीने प्रत्यक्ष काम करायला सुरवात केली होती.