Premium|Marathi acting journey : वाशीत 'झुलवा' नाटकाच्या प्रयोगादरम्यान मद्यधुंद प्रेक्षकाचा राडा; कलाकारांचे लक्ष झाले विचलित!

Theater Performance Incident : रंगमंचावर अभिनय करत असताना प्रेक्षकांकडून मिळणारी दाद आणि एका मद्यधुंद प्रेक्षकामुळे वाशीतील 'झुलवा' नाटकाच्या प्रयोगादरम्यान कलाकारांची उडालेली तारांबळ, विचलित झालेले लक्ष आणि नंतर आलेला एक रंजक अनुभव सांगणारी पडद्यामागची अनोखी नाट्यकथा.
Theater Performance Incident

Theater Performance Incident

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

‘भूमिका चालली’ असं लोक म्हणू लागले. लोक ओळखू लागले. भूमिकेच्या नावानं हाक मारू लागले. कलाकाराला काय पाहिजे असतं अजून? हेच तर होतं, आपल्या लहानशा गावात कुणीतरी ‘छान काम करतोस’ अशी पाठीवर थाप मारतं बस. आम्हाला तेवढंच पुरतं आणि आमचा वारू मुंबईकडे उधळतो. तेच हे... लोकांनी आपल्याला ओळखावं.

‘‘ये अलग है...’’

नाय... नाय... नाय... ये तो वहीं है...

‘‘ऐसा नहीं या... ये...’’

वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘झुलवा’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि ‘स्टेजच्या डाव्या बाजूला अगदी कोपऱ्यात पहिल्या रांगेत बसलेले एक-दोन प्रेक्षक अधूनमधून असा प्रतिसाद (?) देत होते. नाटक चालू असताना आम्हा कलाकारांचं सारखं त्यांच्याकडे लक्ष जायचं. थोडं विचलित व्हायला होत होतं. आम्ही प्रयोग सुरू ठेवला. ते चांगले अगदी पाय पसरून पहिल्या रांगेत बसले होते. त्यांना आम्ही रंगमंचावरून हलकंसं पाहू शकत होतो. त्यांचा ‘असा रिस्पॉन्स’ देणं चालूच होतं.

Theater Performance Incident
Premium|Kaagaz Ke Phool : आयुष्याचं दुःख भरून राहिलेला गीताचा स्वर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com