
चेतन देशमुख-saptrang@esakal.com
हमखास व्याघ्रदर्शनासाठी टिपेश्वर अभयारण्य ओळखले जाते. याच अभयारण्याच्या वेशीवर असलेल्या अंधारवाडीची ओळख मात्र कुणालाच नव्हती. आपल्या वाट्याला आलेला अंधार दूर करण्याचा संकल्प इथल्या गावकऱ्यांनी केला. नुसता संकल्प न करता परिश्रमही घेतले. यामुळेच गावाच्या नावात ‘अंधार’ असला, तरी गावकऱ्यांनी स्वतःच्या ताकदीवर ‘अंधारवाडी’ची ओळख निर्माण केली. जिल्ह्यातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून या गावाची ओळख झाली आहे.