झूम : उन्हाळ्यात वाहन सांभाळा!

Vehicle
Vehicle

सध्या देशात उष्णतेचा कहर सुरू आहे. लॉकडाउन सुरू असल्याने प्रत्येक जण घरात बंदिस्त असला, तरी वाहने मात्र रस्त्यावर आहेत. बाहेर पडता येत नसल्याने आपल्या वाहनांकडे लक्षही देत येत नाहीये. कडक उन्हात वाहने उभी असल्याने गाडीचे तापमान वाढून आग लागू शकते. यातून भयानक दुर्घटना घडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी वाहनांची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कडक उन्हापासून आपल्या कारला वाचवण्यासाठी काही टिप्स...

वाहन झाकून ठेवा
तुमची कार घरात किंवा कार्यालयाच्या ठिकाणी उभी करताना तिच्यावर कव्हर टाकण्यास विसरू नका. यामुळे कारचे उन्हापासून संरक्षण होईल. कव्हरमुळे गाडीचे तापमान वाढून आग लागणार नाही. गाडीचे कव्हर निवडताना शक्यतो पांढऱ्या रंगाचे असावे. त्यामुळे उष्णता शोषली जाणार नाही.

गाडी सावलीत पार्क करा
काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाणारच असाल, तर गाडी एखाद्या झाड किंवा इमारतीखाली, चांगली सावली असलेल्या ठिकाणी पार्क करा. यामुळे गाडीतील तापमान सामान्य राहण्यास मदत होईल. गाडीचा रंग फिका पडण्याची समस्याही निर्माण होणार नाही. 

दुचाकीला सीट कव्हर लावा
उन्हाळ्याच्या दिवसात दुचाकी वाहनांचे सीट कव्हर सर्वांत अगोदर तापतात. यामुळे सीटवर मोठे कव्हर लावावेत. यामुळे अधिक तापमान सहन केले जाते. तसेच यामुळे इंधन टाकीच्या खालच्या भागापर्यंत तापमान न पसरण्यासाठी मदत होते.

वाहन थंड ठेवा
वाहन आपल्या घराबाहेर किंवा जवळच्या ठिकाणी पार्क केले असल्यास त्यावर सतत पाणी टाका. त्यामुळे गाडीचे तापमान नियंत्रित राहते. त्यामुळे दुर्घटना होण्याचा धोका टळतो. याचसह उन्हाळ्यात वाहनाची तपासणी सतत करत राहा. अनेकदा इंजिन गरम झाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ते थंड राहणे अतिशय आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com