एस्टोनियातील शिक्षणव्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक,  फिनलँड
एस्टोनियाच्या शिक्षणपद्धतीचा विचार करताना आपण एस्टोनिया या देशाविषयी काही रंजक तथ्ये पाहिली, तसेच मागील भागात एस्टोनिया आणि तंत्रज्ञान या विषयी माहिती घेतली. या भागापासून आपण एस्टोनिया या देशातील शैक्षणिक व्यवस्थेविषयी थोड्या अधिक प्रमाणात जाणून घेणार आहोत. 

एस्टोनिया देशांमध्ये शिक्षण व्यवस्थेचे पाच भागांत विभाजन केले आहे. यातील पहिला स्तर हा प्री स्कूल म्हणजेच अंगणवाडीचा असतो. दुसऱ्या स्तरावर इयत्ता पहिली आणि दुसरी, याला प्राथमिक शिक्षण म्हटले जाते. तिसरा स्तर हा माध्यमिक शिक्षणाचा असतो. चौथ्या स्तरावर व्यावसायिक शिक्षण दिले जाते आणि यानंतर मुले महाविद्यालयीन शिक्षण घेतात.

वयाच्या अठरा महिने ते सात वर्ष या काळात मुलांना पहिल्या स्तरातील शिक्षण दिले जाते. यातील वय वर्षे तीनपासून वर्ष सातपर्यंतच्या मुलांना अंगणवाडीमध्ये जाण्याची संधी असते. पालकांची तयारी असल्यास मुले वयाच्या सात वर्षापर्यंत घरीच राहून शिक्षण घेऊ शकतात. सात वर्षांनंतरचे शिक्षण मात्र बंधनकारक असते. या बाबतीत एक रंजक गोष्ट म्हणजे इस्टोनिया मध्ये ९३ टक्के अंगणवाड्या या शासकीय असतात, तर ७ टक्के या खासगी. यामध्ये अजून अभ्यास करायचा झाल्यास शासकीय शाळांची ही खासगी अंगणवाड्यांपेक्षा कमी असते , तर खासगी अंगणवाड्यांमध्ये फीचा आकडा हा बऱ्यापैकी मोठा असतो. इतरही खर्च त्याच्याशी जोडलेले असतात.

अशा प्रकारच्या अंगणवाड्यांसाठी नियोजित अभ्यासक्रम हा २००८मध्ये ठरलेल्या राष्ट्रीय अंगणवाडी अभ्यासक्रमासारखाच असतो २०१५च्या ओईसीडी पिसा चाचणीमध्ये एस्टोनिया देशाचा विज्ञानामध्ये प्रथम क्रमांक, गणितामध्ये द्वितीय तर वाचिक ज्ञानामध्ये तृतीय क्रमांक आलेला दिसतो. यामुळे एस्टोनिया जगातील दहाव्या क्रमांकाची हुशार मुले असणारा देश बनतो. या देशात शाळांच्या मधल्या वेळातील जेवण व अवांतर, तसेच अभ्यासाची पुस्तके मोफत पुरवली जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Heramb Kulkarni edu supplement sakal pune today