एस्टोनियातील व्यवसायाधारित शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलंड
एस्टोनियातील शिक्षणपद्धतीच्या साधारण स्वरूपाविषयी याआधी आपण जाणून घेतले. आता यातील माध्यमिक आणि व्यवसायाधारित शिक्षण म्हणजे नेमके काय, याविषयी जाणून घेऊ तसेच पुढील टप्प्यात विषयी चर्चा करू. माध्यमिक प्रकारचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षणावर दर्जावर अवलंबून असते. याचे व्यवसायाधारित शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण असे दोन प्रकार पडतात. यातील माध्यमिक शाळा पार करण्यासाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम असतो. तो म्हणजे इयत्ता दहावी, अकरावी, बारावी. यातून पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय परीक्षा द्यावी लागते; तसेच शोधनिबंध आणि प्रात्यक्षिकही सादर करावे लागते.

नऊ वर्षांचे मूलभूत तसेच बंधनकारक असणारे शिक्षण पूर्ण केल्यानंतर इस्टोनियातील विद्यार्थ्यांना व्यवसायाधारित शिक्षणाचा एक मार्ग खुला होतो. तसे पाहता हा काल कष्टपूर्णच असतो. आपल्याला आवश्यक आणि आवडीच्या व्यवसायाचे तांत्रिक शिक्षण या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाते. यानंतर टप्पा येतो उच्च माध्यमिक शिक्षणाचा. उच्च माध्यमिक शिक्षणाचे पुन्हा तीन भाग पडतात ते अनुक्रमे ‘बॅचलर्स स्टडी’, ‘मास्टर्स स्टडी’ आणि ‘डॉक्टर्स स्टडी’ असे होय. या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एस्टोनियामध्ये आठ विद्यापीठे कार्यरत आहेत. यातील ६ सरकारी, तर २ खासगी आहेत. या विद्यापीठांमध्ये एकूण राहण्याचा खर्च कमी आहे. उत्तम शैक्षणिक दर्जा आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा पुरवण्यात येण्यामुळे अनेक अभ्यासू शास्त्रीय दृष्टिकोन असलेले विद्यार्थी या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. सतत प्रयत्नशील राहणारे आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहणारे असे विद्यार्थी घडवणे हे एस्टोनियातील शिक्षणपद्धतीचे प्रमुख ध्येय आहे. या ध्येयाच्या दिशेने नेहमी एस्टोनियाचे काम असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Heramb Kulkarni edu supplement sakal pune today