रंगसंवाद - 'राम'भक्तीचा अपूर्वानंद

महेंद्र सुके
Friday, 7 August 2020

पेन्सिल स्केचवर उत्तम प्रभुत्व असणारे मुंबईतील गोरेगावचे वास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड. वयाच्या अकराव्या वर्षी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेने ते प्रभावित झाले. त्यातील दृश्यांवर त्यांना चित्रमालिका गुंफायची होती. ते काम त्यांनी २००२ पासून सुरू केले. दरम्यान ते ‘ॲनिमेशन’मध्ये गुंतले.

पेन्सिल स्केचवर उत्तम प्रभुत्व असणारे मुंबईतील गोरेगावचे वास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड. वयाच्या अकराव्या वर्षी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेने ते प्रभावित झाले. त्यातील दृश्यांवर त्यांना चित्रमालिका गुंफायची होती. ते काम त्यांनी २००२ पासून सुरू केले. दरम्यान ते ‘ॲनिमेशन’मध्ये गुंतले. त्यात व्यग्र झाल्याने या चित्रमालिकेवर काम करण्यात खंड पडला. लॉकडाउन सुरू झाले आणि त्यांनी या कामात स्वत:ला गुंतवले. त्यातून त्यांनी अपूर्व आनंद मिळवला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लाड यांनी पेन्सिल स्केचने चितारलेल्या चित्रांचे पहिले प्रदर्शन २००४मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स येथे ‘फन अँड फेअर’मध्ये प्रदर्शित झाले. कलारसिकांनी त्याचे कौतुक केले. ही कौतुकाची थाप त्यांच्यासाठी प्रेरक ठरली. तिथून त्यांनी पुढील प्रदर्शनांना सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या कलाकृतींची अनेक प्रदर्शने भरली. वेगवेगळ्या समूह चित्रप्रदर्शनातही त्यांच्या चित्रांनी शाबासकी कमावली. दृश्यांतील कल्पनाशक्ती, आकर्षक, बोलक्‍या व मनोवेधक पेन्सिल आर्टच्या या अनोख्या कलाविष्काराला उत्तुंग दाद मिळाली. 

या चित्रप्रवासात त्यांना प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळाली. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरवही झाला. मात्र, पोटापाण्यासाठी आधुनिकतेशी दोस्ती करत लाड यांनी २००४मध्ये २-डी क्‍लासिकल ॲनिमेशनचे ट्रेनिंग घेतले. त्या शिक्षणानंतर त्यांनी ॲनिमेशन इंडस्ट्रीत पदार्पण केले आणि त्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांतून स्वत:ला सिद्ध केले. त्यांच्या अनेक २-डी ॲनिमेटेड मालिका कार्टून नेटवर्कवर रिलीज झाल्या आहेत. ‘माय डिअर फ्रेन्ड गणेशा-२’ या हिंदी सिनेमासाठी त्यांनी केलेल्या ॲनिमेशनचे मोठो कौतुक झाले. अनेक ऑनलाइन चॅनेलसाठी त्यांनी स्टोरीबोर्ड केलेले आहेत. पोटापाण्यासाठी ‘ॲनिमेशन’ निवडणारे चित्रकार संतोष लाड याच क्षेत्रात गुंतत गेले आणि रामायणावर चित्रमालिकेकडे थोडे दुर्लक्ष झाले. मात्र ‘लॉकडाउन’मधील एकांत त्यांना मोलाचा ठरला. पेन्सिलवर्कच्या माध्यमातून रामायणावर आधारित अनेक चित्रकलाकृतीतून साकारून त्यांनी आपली ‘रामभक्ती’ जोपासली आहे.

संतोष लाड यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले नसले, तरी त्यांचे वडील शंकर लाड यांच्याकडून बालपणीच त्यांना फिल्म पोस्टर चित्रकारितेचे संस्कार मिळालेत. त्यामुळे वडील आणि त्यांचे सहकारी प्रसिद्ध फिल्म पोस्टर पेंटर एस. रेहमान भाई यांना संतोष चित्रकारितेचे गुरू मानतात. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mahendra suke