#MokaleVha : करिअराय नमः

Education
Education

शिक्षण कुणी, कुठे आणि कसे घेतले, याला महत्त्व द्यायचे; का त्याच्याकडे हुशारी आहे, परिस्थितीने गरीब आहे; पण खरंच बुद्धीला, कष्टाला महत्त्व द्यायचे, हे विचार करण्यासारखे आहे. कारण आता शिक्षणपद्धती फार बदलली आहे. मनापासून शिक्षण घ्यायची इच्छा नाही, फक्त प्रमाणपत्र कसे मिळवता येईल याचाच विचार असतो. भविष्यात काय होईल, याचा विचारच नाही.

‘करिअर’ म्हणजे नेमके कसा आणि कोणता अर्थ घ्यावा, हे मात्र कोडेच आहे. हे स्पर्धेचे युग आहे, कष्टाला पर्याय नाही, हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत. समाधानी केव्हा व्हायचे? माझ्या मैत्रिणीच्या दोन्ही मुलांना चांगल्या कंपनीत नोकरीला असल्याने पॅकेज चांगले. मी म्हटलं छान झालं.

आता लवकरच आधी जावई, नंतर सून आणायची बरं का? तर तिचे उत्तर काय?
अगं मी मुलांना म्हटलं तर आत्ताच नाही. अरे, लवकर झालं तर छान होतं. मी म्हटलं बरोबर आहे तुझं. अगं सारं व्यवस्थित असं आपल्याला वाटतं.

अजून त्यांना ‘करिअर’ करायचंय. आजकालची पिढी ऐकतच नाही. योग्य वयात शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं वेळेत झालं तरच खरं ‘करिअर’, हे त्यांना कळत नाही. पैसा तर किती कमवावा? कसा कमवावा? ज्यातून समाधान मिळालं पाहिजे. ‘करिअर’च्या नादात वय निघून जातं. घर, नोकरी असूनही प्रश्न विचारतात पुढे काय करणार? प्लॅनिंग काय? ‘करिअरविषयी’ काय विचार? असं विचारतात तेव्हा नेमके काय हवं असतं? मला तर वाटतं त्यांनाच अर्थ कळत नाही.

आजकालच्या पिढीला सर्व काही आयतं मिळतं. ‘फक्त कमवा आणि खा, आनंदाने संसार करा, असं आहे. पण.. त्यांना कुठे थांबायचं कळत नाही.’

शिक्षण, नोकरी, प्रमोशनवर प्रमोशन घेत त्या नादात आपण स्वतःला विसरत चाललो. ‘शेवटी सर्व काही पैशासाठी’ ठीक आहे. जेवढा जास्त पैसा कमावतो तेवढा त्याचा आपण आनंद उपभोग घेतला पाहिजे. वय वाढत चाललं, याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलं आणि मुलींनी विचार केला पाहिजे.

‘संसार’ हेसुद्धा करिअरच आहे. सुख, समाधान हे आपण मानण्यात आहे. ‘तुम्ही दिवसभर बाहेर काम करायचं आणि एकमेकाला वेळ केव्हा द्यायचा?
तुम्ही एकमेकांना, घरच्यांना, मुलांना वेळ दिला पाहिजे, तरच तुमच्या करिअरचा उपयोग!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com