सेलिब्रिटी वीकएण्ड : मिसळीचा आणि गप्पांचा ‘कट’

Parth-Bhalerao
Parth-Bhalerao

अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा वीकएण्ड म्हणजे त्याला मिळणारा सुटीचा दिवस; मग तो शनिवार-रविवार असो, नाहीतर आणि कुठला वार. तो दिवस हा आपला हक्काचा असतो. त्यामुळे तो दिवस हा मी स्वतःला देण्यासोबतच आपल्या माणसांबरोबर घालवायला प्राधान्य देतो. घरी असल्यावर माझी सगळी कामं आरामशीर पद्धतीनं चालू असतात. या एका दिवशी मी उशिरा उठतो. शूटिंगच्या व्यस्त शेड्यूलमुळे मला माझ्या आई-बाबांना तितका वेळ देणं हल्ली जमत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ हा मी त्यांच्याबरोबर घालवण्याचा प्रयत्न करतो. मी आणि माझे आई-बाबा, आम्ही सगळेच मिसळप्रेमी आहोत. त्यातून मी आहे पुण्याचा आणि पुण्यात मिसळीची व्हरायटी बघायला मिळते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लहानपणापासून रविवारचा आमचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मिसळ खायची. अगदी आजही रविवारी सुटी आली, की एका ठिकाणाहून मिसळ पार्सल आणायचंच, हे ठरलेलं असतं. मग यासोबत गप्पागोष्टी आल्या. आम्ही फार मजा करत आलोय आत्तापर्यंत सुटीच्या दिवशी आणि आजही त्यात काहीही बदल झालेला नाही.

मला सुटी आहे आणि मी मित्रांना भेटलो नाही, असं कधीही होत नाही. आमचाही एक ठरलेला कट्टा आहे; जिथं आम्ही सगळे जण भेटतो. भरपूर गप्पा मारतो, ज्या ज्या गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत त्या एकमेकांशी शेअर करतो. खरं सांगायचं तर, प्रत्येकाच्याच आयुष्यात मित्रमैत्रिणी म्हणजे दुसरी फॅमिलीच असतात. त्यांना भेटल्यावर वेळ कसा जातो, हे कळतच नाही. 

घरी असल्यावर आपली आवडीची मंडळी आहेतच; पण त्यासोबत गरजेचा असतो तो ‘मी टाइम.’ गेले काही महिने लॉकडाउनच्या काळात अनेक लोकांना आपल्यात असलेले सुप्त गुण सापडले, तर काहींना आपले कामाच्या गडबडीत मागे राहिलेले छंद जोपासायची प्रेरणा मिळाली. माझ्याही बाबतीत तसंच झालं. मी पूर्वी स्केचिंग करायचो, जे मी काही महिन्यांपासून पुन्हा करायला सुरुवात केली आहे. याचबरोबर मला वाचनाची प्रचंड आवड आहे.

घरी असलो, की कोणतं ना कोणतं पुस्तक मी वचतोच. आवर्जून मी त्या दिवशी व्यायाम करतो. काही पाहायच्या राहून गेलेल्या सीरिज असतील, फिल्म्स असतील त्या बघतो. आमच्याकडे घरी पक्षी आहेत. घरी असलो की त्यांना वेळ देतो, त्यांना काय हवं-नको ते बघतो, त्यांच्याशी खेळतो, गप्पा मारतो. या सगळ्या गोष्टी मला आनंद देऊन जातात, फ्रेश ठेवतात आणि पुन्हा काम करायला नवी ऊर्जा देतात.
(शब्दांकन : राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com