दोरीवरच्या उड्या अन्‌ जोरबैठका

डॉ. राजीव शारंगपाणी
बुधवार, 20 मार्च 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

हेल्थ वर्क
दोरीवरच्या उड्या हा एक खूपच प्रचलित व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम चालणे किंवा धावणे यापेक्षा जास्त तीव्रतेचा आहे. विशेषतः वजन जास्त आणि अतिशय टणक फरशीवर व्यायाम करतात, त्यांना घोटे, पोटरीचे हाड, गुडघे, पाठ, कंबर यांचे दुखणे मागे लागण्याची शक्‍यता फारच असते.

त्यामुळे वजन अधिक असणाऱ्यांनी ते कमी करण्याकरिता हा व्यायाम करू नये. त्यांनी चालावे तसेच टणक फरशीऐवजी माती अथवा हिरवळीवर हा व्यायाम करावा. शक्‍यतो आटोपशीर वजन असणाऱ्यांनी हा व्यायाम करावा या व्यायामाची तीव्रता अधिक असल्याने तो जास्त वेळ करता येत नाही.

तसेच पहिल्याच दिवशी व्यायामाचा अतिरेक केल्यास पोटरीचे स्नायू आणि गुडघ्याची वाटी फार दुखते. व्यायामाची सुरवात दहापासून करावी आणि रोज दहा वाढवावे. विशेषतः पावसाळ्यात फारच चिखल झाला असल्यास, धावायला जाण्याऐवजी घरच्या घरी हा व्यायाम करता येतो. जोरबैठका दमश्‍वासाचा व्यायाम आहे. त्यात ताकद वाढण्याचा भाग फार कमी आहे.

पूर्वी मातीवरील कुस्त्या दोन-तीन तासदेखील चालायच्या. त्यासाठी दमश्‍वास वाढवायला व्यायाम केला जाई. जोर बैठका एकाआडएक घालण्यास सपाटे म्हणतात. स्वतःचेच वजन हातांनी व पायांनी उचलायचे असल्याने ते वाढविण्यासाठी अजूनही रोज पाव ते अर्धा किलो तूप प्यायले जाते. (त्यामुळे दमश्‍वास वाढतो अशी अजूनही भाबडी समजूत आहे.) हा व्यायाम करणाऱ्याला शरीराचे वजन जेवढे जास्त तेवढ्या जास्त प्रमाणात खांदे, 
कोपरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी होण्याची शक्‍यता असते. या व्यायाम प्रकारात खांद्याचे पुढचे, दंडाच्या मागचे तसेच मांडीचे पुढचे स्नायू अवास्तव वाढतात आणि गुडघे, खांदे आणि पाठ यांची हालचाल करणाऱ्या स्नायूंचे संतुलन बिघडते. त्यामुळे सांध्यावर वेडावाकडा ताण येऊन अस्थिबंध जास्त ताणले जातात आणि सांध्याची झीज होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rajeev sharangpani all well sakal pune today