स्वास्थ्यनियोजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

हेल्थ वर्क
सध्याचे युग नियोजनाचे आणि व्यवस्थापनाचे आहे. तुम्ही नीट व्यवस्थापन कराल, त्या गोष्टी वाढत जातील. पैशांचे नीट व्यवस्थापन करा ते वाढत जातील. व्यवसायाचे नीट व्यवस्थापन करा, तो वाढेल. त्याऐवजी एखाद्या विकाराचे व्यवस्थापन करीत बसाल, तर तो वाढत जाईल. म्हणजे मधुमेह झाला तेव्हा एकच गोळी खात होतो, आता दोन-चार करत इन्शुलिन इंजेक्‍शनवर येऊन पोचलो. उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यावर एक गोळी खाऊ लागलो आता चार खातो आणि हृदयविकारही सुरू झाला आहे. हे असले ‘वर्धिष्णू व्यवस्थापन’ न केलेलेच बरे. स्वास्थ्यनियोजन म्हणजे करायचे काय? स्वास्थ्य एक, रोग अनेक!! मग एक गोष्ट सांभाळणे जास्त सोपे नाही का? आणि रोग सांभाळण्यापेक्षा रोग गेलेले बरे. फक्त सध्याच्या भाषेत बोलायचे तर ‘गोची’ अशी आहे, की स्वास्थ्यनियोजनाची सुरवात ही फक्त साक्षात्कारानेच होते.

तुम्ही म्हणाल, ‘‘आता हे फार छान सांगितलेत. आता बसतो वाट पाहत साक्षात्काराची आणि झाला की कळवतो तुम्हाला.’ तर असे निराश होण्याचे कारण नाही. साक्षात्कार हा शब्द जरा मोठा आहे. पण एके दिवशी तुम्हाला असे वाटते, की चाललेय हे काही खरे नाही. हे काही बरोबर चाललेले नाही.

त्याचप्रमाणे असे वाटण्याला अनेकदा काहीही कारण लागत नाही. कोणाला लेख वाचून साक्षात्कार होईल, तर कुणाला एखादा दणका बसून होईल. कुणाला अगदी विनाकारण होईल. पण असे वाटल्याशिवाय स्वास्थ्यनियोजन करायला सुरवातच होत नाही.

(उद्याच्या अंकात वाचा - शरीराची ‘काळजी’ घ्यावी, ‘करू’ नये.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rajeev sharangpani all is well sakal pune today