स्वास्थ्य आपले, आपणच पाहायचे

Health
Health

हेल्थ वर्क
आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही पण रोग झाला तर त्यावर काही खर्च करू शकतो एवढेच. त्याचा स्वास्थ्याशी काहीही संबंध नाही हे मात्र विसरले जाते. आपण समजुतीपुरते आरोग्याचे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि लैंगिक आरोग्य असे भाग करू शकतो.

पण, स्वास्थ्य एकच असते. शरीरात उत्तम ताकद, लवचिकपणा आणि दमश्‍वास असणे, समाधानी मन, स्थिर चित्त आणि बुद्धी असणे तसेच प्रेमळ अंतःकरण असणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य असणे असे आपण म्हणू शकतो. असे स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपण सर्व जण सदैव प्रयत्नशील असू शकतो. शरीराबद्दल अनास्था ही एकंदरीत आपल्या संस्कृतीतच आहे की काय असे वाटावे इतपत आपण शरीराविषयी निष्काळजी असतो. ‘आपले’ म्हणता येईल असे जगात फक्त शरीरच असते. ते मरेपर्यंत आपल्याजवळच असते. त्याची नीट काळजी घेण्याऐवजी लोक काळजी करणे पसंत करतात, ही फार आश्‍चर्याचीच गोष्ट आहे. काळजी करून काय होणार? आपल्या शरीरावर गुरुत्वाकर्षणाचा सतत प्रभाव पडत असतो. त्यामुळे शरीराची झीज होत असते. तसेच नकळत आपल्या शरीराची ठेवण बिघडत जाते असते.

स्वयंपाक घरात तासन्‌तास उभ्या राहणाऱ्या गृहिणी, संगणकासमोर अस्ताव्यस्त बसलेले संगणकचालक हे आपले शरीर हळूहळू बिघडवून घेऊ लागतात. सर्वप्रथम शरीर रग लागली आहे, असे कळवते. सामान्यपणे तिकडे दुर्लक्ष केले जाते. त्यानंतर हलके दुखू लागते आणि मग फारच दुखू लागते. अशावेळी आपले शरीर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध योग्य प्रकारे तोलून धरावे लागते. त्यासाठी शरीरात ताकद लागते ती योग्य व्यायामातून मिळते. तसेच, उभे राहण्याची आणि बसण्याची ढबही योग्य ठेवणे आवश्‍यक असते. 

(सोमवारच्या (ता. २७) अंकात वाचा - मानसिक स्वास्थ्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com