ऑन एअर : इंटरनेट आणि ज्ञान

Internet-and-Knowledge
Internet-and-Knowledge

इंटरनेटमुळे ज्ञान संपादन करण्याच्या प्रक्रियेत मोठी क्रांती येणार आहे, असं गेली वीस वर्षे ऐकतोय. कोणालाही कुठेही बसून कधीही कसलीही माहिती लगेच घेता येऊ शकेल. यामुळं प्रत्यक्षात मात्र असं झाल्याचं दिसत नाही.

शाळेत असताना कोणीतरी ओपन बुक परीक्षेबद्दल सांगितलं. पेपर सोडवताना आपण अभ्यासाची पुस्तकं वापरू शकतो. चक्क आख्खं पाठ्यपुस्तक! त्यातली काही पानं फाडून, जापनीज ओरिगामी तज्ज्ञालाही लाजवेल अशा त्याच्या घड्या घालून पॅन्ट आणि बेल्टच्या मध्ये खुपसून, लपवून, आणि एक्झामिनर (वयाने तरुण असेल तर) किंवा इंविजीलेटर (दिसायला सिनिअर असतील तर) यांची नजर चुकवून नव्हे, तर अधिकृतरीत्या या परीक्षांमध्ये आपण पुस्तक रेफर करू शकतो, याचं आम्हा मुलांना खूप कौतुक होतं. अशा परीक्षेत सगळ्यांच्याच पहिला नंबर येत असेल, असा काही मुलांचा तर्क होता, पण सगळेच पहिले आले म्हणजे सगळेच वर्गात शेवटचेही आले, अशीही टिप्पणी काही बाल तत्त्वज्ञांनी केली होती. पुढं जाऊन हीच मुलं राजकीय पक्षाचे प्रवक्ते झाले. इंटरनेटवर सगळी माहिती आहे, पण ती तुम्हाला माहिती नाही. कारण नेमकी कुठली माहिती शोधायची, ती कशी आणि कुठं, हे माहीत नसल्यामुळं ओपन बुक परीक्षेतही सगळे पास होत नाहीत. 

भारताची राष्ट्रभाषा कुठली? हिंदी ना? नाही! भारताला राष्ट्रभाषा नाही. राजभाषा आहेत, ज्या यादीत इंग्रजी आणि मराठीसुद्धा आहेत. पण हे अनेकांना माहीत नाही. 

दारू पिण्यासाठी किमान वय किती असावं. २१ ना? नाही! बिअर वगळता ते २५ आहे. जेव्हा काही अतिउत्साही तरुण, ‘आम्ही १८व्या वर्षी मतदान करू शकतो, तर मद्यपान का नाही? तेव्हा सरकारनं ते २१ वरून १८ वर्ष करावं,’ असं म्हणतात तेव्हा मला गंमत वाटते. ही माहितीही इंटरनेटवर पाच मिनिटांत मिळवता येते.

या चुका फक्त सामान्य माणसांकडून होतात असं नाही. लॉकडाउन शिथिल केल्या केल्या दारूच्या दुकानात बाहेर लागलेल्या रांगा सगळ्या चॅनल्सनी दाखवल्या. दहा किंवा अकरा वाजता दारूची दुकाने उघडतील म्हणून काही मंडळी सकाळी सहा वाजल्यापासूनच रांगेत उभी होती. अनेक आशावादी लोकांनी सहा सहा तास एकाच ठिकाणी उन्हात उभं राहण्याची शिस्त दाखवली.

या विषयावर विनोद होऊच नयेत, असं मी म्हणत नाहीये. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ते भारताचे शेवटचे पंतप्रधान (आत्तापर्यंत) सगळ्यांची खिल्ली उडवणे हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, असे मी मानतो. पण यातल्या विनोदाचं लक्ष्य कोण असावं हे महत्त्वाचं. दारुड्या गरीब व मध्यमवर्गीय असल्यास त्याचं हसं होतं. तोच श्रीमंत असल्यास कूल आणि पार्टी ॲनिमल ठरतो. ज्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे सगळे नियम, निकष, परिमाण आपण कोरोनाच्या लढ्यात वापरतोय, त्याच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार २० ते ३९ वर्षं या वयोगटातील साडेतेरा टक्के मृत्यू हे दारूमुळे होतात, जगातले पाचपेक्षा जास्त टक्के आजार दारूच्या व्यसनामुळं होतात.

अमेरिकन मेडिकल असोसिएशननं तर दारूच्या व्यसनालाच आजार घोषित केलं आहे. तेव्हा या विषयावर विनोद करताना त्याचं लक्ष्य, त्याचा टार्गेट हा व्यसनी माणूस न करता, आधुनिक सरकार प्रशासन आणि अर्थव्यवस्था करता येईल का? दारूशिवाय ती चालूच शकत नाही, तिच्याशिवाय कोलमडून गटारात पडू शकते? विनोदाचं लक्ष्य आपण या समाजालाच करू शकतो का, जो आपल्याच आजारी माणसांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानतो? दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तीला तळीराम, बेवड्या वगैरे म्हणणं म्हणजे कोरोनाची लक्षणं असणाऱ्याला शेंबड्या म्हणण्यासारखं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com