#MokaleVha संगीत थेरपी - मेंदूसाठी वरदान

संतोष घाटपांडे, सर्टिफाइड प्रॅक्टिसिंग म्युझिक थेरपिस्ट
Sunday, 18 October 2020

मानवी जीवनात संगीत कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत कलेचा इतिहास सांगतो, की संगीताची उत्पत्ती ही भावना व्यक्त करण्यासाठी झाली आहे. कालांतराने आणि विविध सामाजिक बदलांमुळे संगीत हे ‘आर्ट व संगीत थेरपी’ म्हणून गणले जात आहे. संगीत कलेचा मानवी मेंदूशी थेट संबंध येऊन त्याद्वारे मानसिक आरोग्यावर विविध सकारात्मक परिणाम होतात.

मानवी जीवनात संगीत कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत कलेचा इतिहास सांगतो, की संगीताची उत्पत्ती ही भावना व्यक्त करण्यासाठी झाली आहे. कालांतराने आणि विविध सामाजिक बदलांमुळे संगीत हे ‘आर्ट व संगीत थेरपी’ म्हणून गणले जात आहे. संगीत कलेचा मानवी मेंदूशी थेट संबंध येऊन त्याद्वारे मानसिक आरोग्यावर विविध सकारात्मक परिणाम होतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण व्यायामासारख्या चांगल्या गोष्टी करण्याचा विचार करतो तेव्हा, आपल्या शरीराबद्दल आपण नेहमी विचार करतो. परंतु, यामध्ये आपल्या शरीराचा अत्यंत आवश्यक अवयव ‘मेंदू’ विसरतो. संगीत थेरपी मेंदूसाठी ‘स्पा’ म्हणून कार्य करते. संगीत थेरपीमुळे मेंदूला पोषक द्रव्ये मिळतात आणि मेंदूची सर्व केंद्रे कायम सक्रिय राहतात. तर, मानसिक स्वास्थ्य व आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात संगीत कला समाविष्ट करणे फार महत्त्वाचे आहे. संगीत थेरपी हा एक प्रोग्राम आहे, जो सर्व आजार बरे करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये सक्रिय तसेच निष्क्रिय तंत्र असू शकतात. १२ मज्जातंतूंपैकी १० मज्जातंतू हे कानांशी जोडलेले असतात, जे आपल्या थेट मज्जासंस्थेशी निगडित व कार्यरत असतात. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे संगीत ऐकल्याने मेंदूचे कार्य चांगले सुधारते.

सामान्यतः लोक कामाच्या थकव्यानंतर विश्रांतीसाठी व मानसिक समाधानासाठी एक साधन म्हणून संगीत कलेचा वापर करतात. संगीत कलेचा वापर ताणतणावापासून तात्पुरते शरीर आणि मन हलके व मोकळे करण्यासाठी केला जातो. मानसिक आरोग्याच्या बाबतीत नैराश्य ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे मूडमध्ये बदल होतो आणि स्वारस्य, आनंद कमी होतो. संगीत थेरपीमुळे नकारात्मकतेची, नैराश्याची लक्षणे आणि चिंता कमी होऊन मेंदूचे कार्य सुधारते.

आजच्या कोरोनाच्या साथीत, समाजाचा एक मोठा वर्ग मानसिक ताणतणाव, निराशा, चिंता, काळजी, एकटेपणा आणि नकारात्मकतेसह अंतर्गत आघात व विकारांनी ग्रस्त आहे. म्हणूनच, आजूबाजूच्या सर्व नकारात्मकतेशी लढा देण्यासाठी संगीत थेरपी ही काळाची गरज आहे. संगीत थेरपी ही समाजातील प्रत्येक नागरिकाला तणावमुक्त आणि सुधारित जीवनाची संधी देते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Santosh Ghatpande Mokale Vha