शिक्षा काय साधते?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
शाळेतल्या मुलांना शिक्षा का केल्या जातात? त्यांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या केल्या जातात? शिक्षा करताना नेमके कुठले हेतू वेगवेगळे हेतू असू शकतात.

 • शिक्षकांना वर्गावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असतं.
 • शिक्षकांकडून (काही वेळा) घरचा किंवा बाहेरच्या परिस्थितीचा राग शाळेतल्या मुलांवर काढला जाऊ शकतो.

अर्थात त्याचप्रमाणे -

 • मुलांच्या भांडणात एकावर अन्याय होत असेल, तर भांडणं मिटण्यासाठी व न्याय देण्यासाठी 
 • मुलांना शिस्त लागावी व त्यांच्या वागण्यात सकारात्मक बदल व्हावेत म्हणून असे चांगले हेतूही असतात, पण चांगल्या हेतूनं केलेल्या शिक्षेचेही परिणाम वाईट किंवा विपरीत होऊ शकतात, हे लक्षात घ्यावं लागतं. शिक्षेचे जे सर्वसाधारण परिणाम दिसून येतात, होऊ शकतात ते असे -
 • वारंवार होणाऱ्या शिक्षेमुळं मुलं निगरगट्ट बनतात.
 • शिक्षेकडं दुर्लक्ष करण्याकडं मुलांचा कल वाढतो.
 • शाळेत दिल्या जाणाऱ्या शिक्षेबाबत मुलं पालकांना घरी काहीच सांगत नाही.
 • शिक्षा स्वीकारण्याचीही मुलांना सवय लागते. त्यातून जुलमानं का होईना, त्यांच्या अंगी शिस्त रुजण्याची थोडीबहुत शक्‍यता असते.
 • शिक्षेमुळं मुलांच्या भावना दुखावल्या जातात. त्यांना अपमानाची जाणीव व्हायला लागते. या सगळ्यातून मुलं अबोल बनतात. परिणामी काही मानसिक समस्या उद्‌भवू शकतात.
 • शिक्षेमुळं स्पर्धा आणि एकमेकांवर कुरघोडी करणे या गोष्टी वाढतात.
 • शिक्षा म्हणून गृहपाठ दिला असल्यास गृहपाठ, बघून किंवा घरच्या लोकांना विचारून तो करणे, या गोष्टी सर्रास घडतात. त्यामुळं गृहपाठाचा (व ‘शिक्षे’चा) मूळ हेतूच नाहीसा होतो. 
 • असे हे शिक्षेचे परिणाम बऱ्याचदा नकारात्मक, क्वचित कधी सकारात्मक म्हणूनच शाळेतल्या शिक्षांबद्दल जागरूक राहण्याची जबाबदारी समाजातील सर्वांवर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Shivraj Gorle Edu Supplement Sakal Pune Today