esakal | तंत्रकुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता
sakal

बोलून बातमी शोधा

Career

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

तंत्रकुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये गेल्या दशकापासून इंग्रजीतून शिक्षण घेता येऊ शकते. जर्मनीमध्ये तर पदव्युत्तर शिक्षणासाठी अत्यल्प फी असते किंवा ते मोफत असते. विशेषतः तांत्रिकी, ऑटोमेशन, ऑटोमोबाईल, केमिकल संदर्भात जर्मनीत जाणे सोपे ठरते, तर बायोटेक, व्हायरॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी व केमिकल रिसर्च यासाठी फ्रान्स पुढारलेला आहे. कलेच्या संदर्भात पॅरिसला सारेच प्राधान्य देतात. डिझाइनसाठी इटलीमधील काही संस्था सर्वोत्तम गणल्या जातात. भाषेची प्राथमिक पातळी (जी बारावीपेक्षा थोडी वरची समजावी-B1) पूर्ण करून शिक्षणासाठी या देशात गेल्यास त्याचे करिअर करण्यासाठी नक्की फायदे होतात. अर्थात, या तिन्ही देशांत, किंबहुना साऱ्याच युरोपमध्ये बाहेरच्यांचे कायम वास्तव्यासाठी स्वागत होत नाही. ‘शिका आणि परत जा,’ हे त्यांचे धोरण प्रथम लक्षात घ्यावे. ऑटोमिक एनर्जी व एव्हिएशन संदर्भातील उत्कृष्ट संशोधन फ्रान्समध्ये करता येऊ शकते. सिनेमॅटोग्राफीमध्ये रस असल्यास फ्रान्स त्याची मायभूमीच समजा. मेडिकल पदवी शिक्षणासाठी रशियातील काही विद्यापीठे मान्यवर व परवडणारी समजली जातात, पण परतल्यानंतर मेडिकल कौन्सिलच्या परीक्षा पास होण्याचा एक मोठा अडसर येऊ शकतो. रुग्णांशी संवाद ही अडचण तर महाराष्ट्र सोडून बाहेर जाणाऱ्यांनाही येऊ शकते ना? 

मात्र कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांमधली गरज अगदी वेगळी आहे. त्यांच्याकडे प्रचंड भौगोलिक विस्तार आहे. अपुरे मनुष्यबळ त्यांना वाढवायचे आहे.

त्यासाठी शिकायला, कामाला येणारे तंत्रकुशल मनुष्यबळ वाढवायची त्यांची तयारी आहे. अमेरिकेचा अत्यंत कठीण असा ग्रीनकार्डपर्यंतचा प्रवास इथे सुलभपणे पर्मनंट रेसिडेन्सीमध्ये (पीआर) रूपांतरित होऊ शकतो. वयाच्या विविध टप्प्यांवर शिकण्याचे वा नोकरीचे पर्याय तिथे नक्की उपलब्ध होऊ शकतात. इमिग्रेशनची तांत्रिक प्रोसेस पूर्ण करून विविध व्यावसायिक तिथे स्थायिक व्हायचा विचार करू शकतात. 

शेवटी अमेरिकेतील ‘लाइफस्टाइल’ व डॉलरमधील मिळकत अन्यत्र उपलब्ध होत असेल तर?  

दुधाची तहान ताकावर भागवणे हाही एक छान उपाय ठरतो.

loading image
go to top