इंटर्नशिपचे प्राधान्य

Career
Career

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
‘उमेदवारी म्हणजे काय?’ असा प्रश्‍न मला एका विद्यार्थ्याने मागचा लेख वाचून केला. इंटर्नशिप असे त्याला सांगितल्यावर त्याला शब्दार्थ कळला, पण ज्यावेळी मी त्याला उलट प्रश्‍न केला, की ‘इंटर्न म्हणजे काय रे भाऊ?’ तो खरोखर गडबडला. कारण त्याला शब्दार्थ कळला होता, पण त्यातील भावार्थ उमगलाच नव्हता. हे सारे विस्ताराने लिहिण्याचे कारण म्हणजे शिकणे, परीक्षा देणे, मार्क आणि पदवी मिळविणे या जोडीला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे इंटरर्नशिप करणे हा भाग गेल्या दोन दशकात, म्हणजे तेच हो एकविसाव्या शतकात, आपण विसरत गेलो आहोत. 

अधिकृत काम, अधिकृत व जबाबदार व्यक्तीच्या देखरेखीखाली पण स्वतःची निर्णयक्षमता न वापरता योग्य तऱ्हेने, उपयुक्त पद्धतीने, दिलेल्या वेळेत पार पाडणे शिकणे म्हणजे इंटर्नशिप किंवा उमेदवारी. ही काही शब्दकोशातून घेतलेली व्याख्या नाही; पण सारांशाने इंटर्नने कसे वागावे, याबद्दलची एक सूचक लक्ष्मणरेषाच समजा ना!’’ 

या इंटर्नशिपची गरज येत्या दशकात प्रचंड वाढत जाणार आहे, हे जरा पालकांनी लक्षात घ्यायला हवे. गेल्या शतकात घेतलेली पदवी व मिळणारे काम यामध्ये प्रचंड तफावत फारशी नसायची. याउलट सध्यासुद्धा घेतलेली पदवी, त्यात शिकलेले विषय व मिळणारे काम यामध्ये अनेकदा खूप खूप वेगळेपण सापडत आहे. ते वाढत जाऊन प्रत्यक्ष हातातून गेलेल्या कामाला, अनुभवाला म्हणजेच इंटर्नशिपला मोठेच प्राधान्य मिळणार आहे हे नक्की समजा. 

आजवर अत्यंत हुशार असे आयआयटीयन्स इंजिनिअर्स पदवीचा विषय व कामाचा विषय यात पूर्णतः वेगळे स्वरूप असले, तरी त्यात सहजपणे यशस्वी होत होते. अशी अनेक उदाहरणे आहेत. सुंदर पिचाई मेटॅलर्जी इंजिनिअर, तर अच्युत गोडबोले केमिकल इंजिनिअर. दोघेही आयटीमधील कंपन्यांचे प्रमुख. आयसीआयसीआयचे सर्वेसर्वा कामत मॅकॅनिकल इंजिनिअर. अर्थतज्ज्ञ विजय केळकर हे सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअर होते. अशा उदाहरणातून आपण सारेच आश्‍चर्यचकित होत  जातो. आता यानंतरच्या दशकात हे घडण्याची शक्‍यता लक्षात घ्या. अमेझॉन, फ्लिपकार्ट, बिगबझार, जिओ, टाटा स्काय, जंगली पिक्‍चर्स किंवा वॉल्ट डिस्नेसाठी पदवीपेक्षा इंटर्नशिप महत्त्वाची... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com