esakal | शरीराचा अश्‍वमेध यज्ञ
sakal

बोलून बातमी शोधा

Sri-Sri-Ravishankar

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

शरीराचा अश्‍वमेध यज्ञ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चेतना तरंग
रामायण ही काही वेळाच घडणारी कथा नाही. तत्त्वज्ञान तसेच आध्यात्मिक महत्त्व असलेल्या रामायणात खोलवर सत्यही दडले आहे. रामायणात राजा दशरथाला तीन राण्या असतात. एकावेळी दहा रथ चालवू शकणारा असा दशरथाचा अर्थ होतो. तुमचे शरीर म्हणजे दशरथ आणि पंचेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आदी) व हात, पाय, गुदाशय, जननेंद्रिये आणि तोंड हे पाच कृतिशील अवयव म्हणजे दहा रथ होय. हे दहाही रथ मनाला वेगवेगळ्या दहा दिशांना घेऊन जातात आणि मग जीवनही या वेगवेगळ्या दिशांना नेतात.

दशरथाच्या तीन राण्यांची नावेही मनोरंजक आहेत. त्याच्या कौशल्य या पहिल्या राणीच्या नावाचा अर्थ कौशल्य होतो. सुमित्रा हे दुसऱ्या राणीच्या नावाचा अर्थ चांगला मित्र होतो. आपल्याला अनेक मित्र असू शकतात, मात्र सर्वजण चांगले मित्र नसतात. उलट अनेक वेळा तर मित्रच तुम्हाला चुकीच्या दिशेने नेतात. तुम्हाला योग्य दिशेने नेतो, तो सुमित्र होय. दशरथाच्या तिसऱ्या राणीचे नाव कैकेयी होते. वरवर पाहता ती वेगळी दिसत असली तरी खोलवर पाहिल्यास ती तुमच्या बाजूने उभी असते. तिच्यात एकप्रकारचा परोपकारभावच होता. एखादा डॉक्‍टर तुम्हाला कडू औषध देतो किंवा लस देतो, त्याप्रमाणेच कैकयीची भूमिका आहे. या डॉक्‍टरप्रमाणेच कैकेयी तुमच्यासाठी योग्य आहे, ते करते. दशरथ आणि कौशल्याने एक यज्ञ केला, त्याला अश्‍वमेध यज्ञ म्हटले जाते. त्यानंतर, त्यांना चार पुत्रांची प्राप्ती झाली.

अश्‍वमेध म्हणजे शुद्धीकरण. श्‍व म्हणजे काल किंवा उद्या होय. अश्‍वचा अर्थ आज असा होतो. आता कालही नाही आणि उद्याही नाही. अश्‍व म्हणजे वर्तमानकाळातील क्षण होय. मेधा म्हणजे बुद्धी. अश्‍वमेध याचा अर्थ सध्याच्या क्षणात बुद्धी आणणे होय. त्याचप्रमाणे, सध्याच्या वर्तमान क्षणात राहत शुद्ध होणे, असाही अश्‍वमेधचा दुसरा अर्थ आहे. शरीरमन, जाणिवा, आत्मा आदी सर्वांचे शुद्धीकरण करणे, आत्म्यात खोलवर जाणे होय. त्यामुळे दशरथ आणि कौसल्येने एकत्र येत अश्‍वमेध यज्ञ केला. त्याचक्षणी रामाचा जन्म झाला. श्रीरामाच्या जन्माचे हे आध्यात्मिक महत्त्व आहे. किरण, तेज अशा सर्व प्रकारचे शब्द ‘रा’ या मूळ संस्कृत शब्दावरून आले आहेत. प्रकाश, तेज, चमक असा याचा अर्थ होतो. ‘म’ म्हणजे माझ्या आत, माझ्या हृदयात. राम म्हणजे माझ्या हृदयाचा प्रकाश होय. या शरीरातील काही कौशल्ये असलेले मन वर्तमान क्षणात आल्यास त्याच्यासह हृदयही शुद्ध होते. त्यानंतर, आपल्या हृदयाचा प्रकाश असा अर्थ असलेला राम प्रकटतो.

अश्‍वमेध केल्यानंतर चार गोष्टी प्रकट होतात. तुमच्या जाणिवा शुद्ध होतात, तेव्हाच तुमच्या हृदयात राम (दैवी प्रकाश) आणि लक्ष्मण (जागरूकता) प्रकटतो. त्यानंतर, तुम्हाला कोणताही शत्रुघ्न (शत्रू) राहत नाही आणि सर्व प्रतिभा (भरत) तुमच्यात प्रकटते. तुमची मेधा (बुद्धी) वर्तमान क्षणात अतिशय खोलवर असेल तर कुणीही तिला हलवू शकत नाही. केवळ भूतकाळ आणि भविष्यच तुमच्या बुद्धीला हलवू शकते. तुम्ही प्रत्येक क्षणाला स्वत:ला भूतकाळ आणि भविष्यकाळातून बाहेर काढू शकता तेव्हा तुम्ही मुक्त असता.

loading image